મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

पुणे व्यावसायिक अशोक जैन आत्महत्या प्रकरण

₹१५ कोटींच्या फसवणुकीप्रकरणी चौघांवर गुन्हा

PG
Prashik Ghaste

1 મિનિટ વાંચન

पुणे व्यावसायिक अशोक जैन आत्महत्या प्रकरण

₹१५ कोटींच्या फसवणुकीप्रकरणी चौघांवर गुन्हा

पुणे: सॅलिस्बरी पार्क परिसरातील नामांकित बांधकाम व्यावसायिक अशोक मिलापचंद जैन (वय ६१) यांनी कथित आर्थिक फसवणूक आणि मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी डेक्कन जिमखाना पोलिसांनी चौघांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोक जैन हे ९ मे रोजी सकाळी घरातून बाहेर पडले होते. त्यानंतर त्यांच्याशी संपर्क होत नसल्याने कुटुंबीयांनी स्वारगेट पोलिस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेजमध्ये जैन हे दुचाकीवरून आपटे रोडच्या दिशेने जाताना दिसून आले.

आपटे रोडवरील हॉटेलात मृत्यू
दरम्यान, १० मे रोजी दुपारी आपटे रोडवरील हॉटेल कोरोनेटच्या व्यवस्थापनाने डेक्कन जिमखाना पोलिसांना एका पाहुण्याकडून प्रतिसाद मिळत नसल्याची माहिती दिली. पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता जैन मृतावस्थेत आढळून आले.

खोलीत विविध ठिकाणी उलटीचे डाग आढळून आल्याने विषारी पदार्थ सेवन केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. हा प्रकार ९ मे रोजी दुपारी ३.४५ ते ४ वाजण्याच्या सुमारास घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

सुसाईड नोट मिळाली
घटनास्थळी सापडलेल्या हस्तलिखित चिठ्ठीत जैन यांनी त्यांच्या मृत्यूसाठी चौघांना जबाबदार धरले आहे. कोंढवा परिसरातील ‘प्रचित हाइट्स’ या निवासी प्रकल्पात आरोपींनी तब्बल ₹१५ कोटींची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

जबरदस्तीने करारावर स्वाक्षऱ्या
जैन यांचा मुलगा मोहित अशोक जैन (वय ३२) यांनी दिलेल्या फिर्यादीत, आरोपींनी तोंडी व्यवहारात ठरलेल्या रकमेपेक्षा खूप कमी रकमेसाठी जबरदस्तीने करारावर स्वाक्षऱ्या करून घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. या आर्थिक फसवणुकीमुळे आणि मानसिक त्रासामुळेच वडिलांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

डेक्कन जिमखाना पोलीस पुढील तपास करत आहेत.

पुणे क्राईम न्युज

શેર કરો