મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

Pune News : भारती विद्यापीठ परिसरात दोन अल्पवयीन मुलांकडून गावठी कट्टा जप्त

पुणे, महाराष्ट्र मिरर : भारती विद्यापीठ पोलिसांनी १८ सप्टेंबर रोजी सायंकाळी लेकटाऊन रस्त्यावर दोन विधिसंघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून गावठी बनावटीचा कट्टा जप्त केला.

વક
વિક્રાંત કુલકર્ણી

1 મિનિટ વાંચન

भारती विद्यापीठ परिसरात दोन अल्पवयीन मुलांकडून गावठी कट्टा जप्त लेकटाऊन रस्त्यावर गस्तीदरम्यान पोलिसांची कारवाई; जप्त कट्ट्याची किंमत ५० हजार रुपये**
भारती विद्यापीठ परिसरात दोन अल्पवयीन मुलांकडून गावठी कट्टा जप्त लेकटाऊन रस्त्यावर गस्तीदरम्यान पोलिसांची कारवाई; जप्त कट्ट्याची किंमत ५० हजार रुपये**

Pune News : लेकटाऊन रस्त्यावर गस्तीदरम्यान पोलिसांची कारवाई; जप्त कट्ट्याची किंमत ५० हजार रुपये

पुणे, महाराष्ट्र मिरर : भारती विद्यापीठ पोलिसांनी १८ सप्टेंबर रोजी सायंकाळी लेकटाऊन रस्त्यावर दोन विधिसंघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून गावठी बनावटीचा कट्टा जप्त केला. जप्त कट्ट्याची किंमत ५० हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.https://maharashtramirror.com/ Pune News

वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अण्णा दराडे आणि पोलीस अंमलदार परिसरात गस्त घालत होते. त्या वेळी मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, लेकटाऊन रस्त्यावरील शंकरराव राजाराम कदम जलतरण तलावासमोरील रस्त्यालगत दोन अल्पवयीन मुले थांबल्याचे पथकाला समजले. पथकाने सायंकाळी आठच्या सुमारास त्या ठिकाणी जाऊन शोध घेतला असता दोघे जण आढळले. त्यांच्याकडून गावठी बनावटीचा एक कट्टा हस्तगत करण्यात आला, अशी माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियमाच्या कलम ३ सह २५ आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम ३७(१)(३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.https://maharashtramirror.com/ Pune News

ही कारवाई पोलीस उपआयुक्त मिलिंद मोहिते आणि सहायक पोलीस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अण्णा दराडे, पोलीस अंमलदार सागर बोरगे, मितेश चोरमोले, अभिनय चौधरी आणि सोहम शेंडकर यांच्या पथकाने केली.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

શેર કરો