મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

Pune News : आंबेगावमध्ये कारच्या धडकेने ज्येष्ठ पादचाऱ्याचा मृत्यू

Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर : आंबेगावमध्ये कात्रज चौकातून नवले पुलाकडे जाणाऱ्या महामार्गावर कारने धडक दिल्याने ७५ वर्षीय पादचाऱ्याचा मृत्यू झाला.

વક
વિક્રાંત કુલકર્ણી

1 મિનિટ વાંચન

आंबेगावमध्ये कारच्या धडकेने ज्येष्ठ पादचाऱ्याचा मृत्यू कात्रज–नवले पूल महामार्गावरील घटना; अनोळखी महिला चालकाविरुद्ध गुन्हा दाखल
आंबेगावमध्ये कारच्या धडकेने ज्येष्ठ पादचाऱ्याचा मृत्यू कात्रज–नवले पूल महामार्गावरील घटना; अनोळखी महिला चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

Pune News : कात्रज–नवले पूल महामार्गावरील घटना; अनोळखी महिला चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर : आंबेगावमध्ये कात्रज चौकातून नवले पुलाकडे जाणाऱ्या महामार्गावर कारने धडक दिल्याने ७५ वर्षीय पादचाऱ्याचा मृत्यू झाला. महिला चालकाने वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून भरधाव आणि निष्काळजीपणे कार चालवल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी आंबेगाव पोलीस ठाण्यात अनोळखी महिला चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.https://maharashtramirror.com/ Pune News

संभाजी गोविंद साळुंखे (वय ७५, रा. गणेश चेंबर्स, साई सिद्धी चौक, आंबेगाव पठार) असे मृत्यू झालेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. त्यांचे पुत्र उमेश संभाजी साळुंखे (वय ४७) यांनी फिर्याद दिली आहे.https://maharashtramirror.com/ Pune News

१ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास अभिनव कॉलेजसमोर, अॅटमासस्पीअर इमारतीसमोरील महामार्गावर हा अपघात झाला. फिर्यादीनुसार, संभाजी साळुंखे पायी जात असताना महिलेच्या ताब्यातील कारने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत ते गंभीर जखमी झाले आणि त्यांचा मृत्यू झाला. आरोपी महिला चालकाला अद्याप अटक झालेली नाही. पोलीस उपनिरीक्षक फिरोज मुलाणी पुढील तपास करीत आहेत.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

શેર કરો