મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

Prafull’s Patel : अशोक खरात सेक्स स्कँडल: रुपाली चाकणकरांवर टांगती तलवार; प्रफुल्ल पटेलांनी जाहीर केली राष्ट्रवादीची अधिकृत भूमिका

Prafull Patel On NCP : "पुढील दोन दिवसांत सक्तीची कारवाई"; खरातच्या कार्यालयातील 58 व्हिडिओंत बड्या नेत्यांची नावे असल्याची खळबळजनक चर्चा

વ
વિવેક

2 મિનિટ વાંચન

Prafull Patel On Maharashtra Budget

Prafull Patel On NCP : "पुढील दोन दिवसांत सक्तीची कारवाई"; खरातच्या कार्यालयातील 58 व्हिडिओंत बड्या नेत्यांची नावे असल्याची खळबळजनक चर्चा

मुंबई :- नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात ऊर्फ 'कॅप्टन' याच्या काळ्या करतुतांनी महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले असतानाच, आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने या प्रकरणावर आपली अधिकृत भूमिका स्पष्ट केली आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे खरातसोबतचे वादग्रस्त फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाल्याने पक्षावर होणारी टीका पाहता, राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी आज पत्रकार परिषद घेऊन कठोर कारवाईचे संकेत दिले आहेत.

"कोणीही असो, गय करणार नाही"; प्रफुल्ल पटेलांचा इशारा

प्रफुल्ल पटेल यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले की, अशोक खरात प्रकरणात पक्षाची भूमिका अत्यंत कडक आहे."या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून ज्यांची नावे यामध्ये समोर येतील, त्यांच्यावर तातडीने आणि सक्तीने कारवाई केली जाईल. यामध्ये अनेक राजकीय व्यक्तींची नावे जोडली जात आहेत, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही योग्य ती पावले उचलू. येणाऱ्या एक-दोन दिवसांत यावर अंतिम निर्णय घेतला जाईल," असे पटेल यांनी सांगितले.या विधानामुळे रुपाली चाकणकर यांच्या पदावर टांगती तलवार असल्याचे मानले जात आहे.

पाद्यपूजन आणि छत्री धरल्याचे फोटो व्हायरल

सोशल मीडियावर रुपाली चाकणकर यांचे अशोक खरातसोबतचे अनेक फोटो व्हायरल झाले आहेत. यामध्ये त्या खरातच्या पाया पडताना, त्याचे पाद्यपूजन करताना आणि भर पावसात त्याच्या डोक्यावर छत्री धरताना दिसत आहेत. महिलांच्या हक्कासाठी काम करणाऱ्या आयोगाच्या अध्यक्षाच अशा प्रकारे एका भोंदू बाबाच्या अधीन कशा, असा सवाल उपस्थित करत विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे.

तपासात सापडल्या 58 'आक्षेपार्ह' चित्रफिती

नाशिक गुन्हे शाखेच्या पथकाने खरातच्या कॅनडा कॉर्नर येथील कार्यालयावर छापा टाकला असता, तिथे 58 आक्षेपार्ह व्हिडिओ सापडले आहेत.

नामांकित व्यक्तींचा समावेश: या व्हिडिओमध्ये काही नामांकित महिला, वरिष्ठ शासकीय अधिकारी आणि बड्या राजकीय नेत्यांची माहिती व चित्रीकरण असल्याचे बोलले जात आहे.

ब्लॅकमेलिंगचा संशय: खरातने दैवी शक्तीचा दावा करून आणि गुंगीकारक पदार्थ देऊन महिलांवर अत्याचार केले आणि त्याचे चित्रीकरण करून त्यांना ब्लॅकमेल केल्याचा संशय पोलिसांना आहे.

24 मार्चपर्यंत पोलीस कोठडी

2022 पासून डिसेंबर 2025 पर्यंत एका पीडित महिलेवर वारंवार अत्याचार केल्याच्या तक्रारीवरून खरातला अटक करण्यात आली आहे. नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने त्याला 24 मार्च 2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंचल मुदगल यांच्या नेतृत्वाखालील पथक या प्रकरणाचा तपास करत असून, आणखी काही पीडित महिला तक्रारीसाठी पुढे येण्याची शक्यता आहे.

શેર કરો