મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

Thane News : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात तपासाला वेग; दोन आरोपींची खंडणी विरोधी पथकाकडून कसून चौकशी

Thane News : ठाणे : ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या निर्घृण हत्या प्रकरणाचा तपास आता वेगाने सुरू झाला असून, या प्रकरणातील अटकेत असलेले मुख्य आरोपी निखिल यादव आणि नितेश पवार यांची ठाणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाकडून कसून चौकशी केली जात आहे.

વક
વિક્રાંત કુલકર્ણી

1 મિનિટ વાંચન

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात तपासाला वेग; दोन आरोपींची खंडणी विरोधी पथकाकडून कसून चौकशी
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात तपासाला वेग; दोन आरोपींची खंडणी विरोधी पथकाकडून कसून चौकशी

Thane News : ठाणे : ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या निर्घृण हत्या प्रकरणाचा तपास आता वेगाने सुरू झाला असून, या प्रकरणातील अटकेत असलेले मुख्य आरोपी निखिल यादव आणि नितेश पवार यांची ठाणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाकडून कसून चौकशी केली जात आहे.https://maharashtramirror.com/ Thane News

गुन्हे शाखेकडून खंडणी विरोधी पथकाकडे तपास
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री ठाणे गुन्हे शाखेच्या युनिट-५ च्या पथकाने निखिल यादव आणि नितेश पवार यांना ताब्यात घेतले होते. दोन्ही आरोपींची प्राथमिक चौकशी पूर्ण झाल्यानंतर प्रकरणाचे गांभीर्य आणि त्यातून समोर आलेले धागेदोरे लक्षात घेऊन अधिक सखोल तपासासाठी त्यांना खंडणी विरोधी पथकाकडे सोपवण्यात आले आहे.https://maharashtramirror.com/ Thane News

८ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी
या दोन्ही आरोपींना ठाणे न्यायालयाने ८ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे तपास यंत्रणांना हत्येमागील नेमके कारण, कटातील सहभाग आणि या प्रकरणाशी संबंधित इतर व्यक्तींची भूमिका तपासण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला आहे.

सध्या ठाणे गुन्हे शाखा आणि खंडणी विरोधी पथक संयुक्तपणे या हत्येचा तपास करत आहेत. या चौकशीत हत्येमागील नेमका कट, आरोपींचे संभाव्य सहकारी, हत्येपूर्वी आणि हत्येनंतरच्या हालचाली तसेच या प्रकरणामागील इतर धागेदोरे तपासले जात आहेत. तपासादरम्यान आणखी काही महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता असून, पोलिसांकडून या संपूर्ण प्रकरणाची विविध बाजूंनी चौकशी सुरू आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

શેર કરો