મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

Pune News : वाहकांनी दाखवली माणुसकी; महिलेची हरवलेली बॅग प्रामाणिकपणे केली परत

Pune News :पुणे : बसमध्ये विसरलेली बॅग, त्यात रोख रक्कम आणि महत्त्वाची कागदपत्रे… अशा परिस्थितीत बॅग सापडल्यावर ती प्रामाणिकपणे संबंधित प्रवाशापर्यंत पोहोचवून पीएमपीएमएलच्या दोन कर्मचाऱ्यांनी माणुसकीचे दर्शन घडविले.

વક
વિક્રાંત કુલકર્ણી

1 મિનિટ વાંચન

वाहकांनी दाखवली माणुसकी; महिलेची हरवलेली बॅग प्रामाणिकपणे केली परत
वाहकांनी दाखवली माणुसकी; महिलेची हरवलेली बॅग प्रामाणिकपणे केली परत

Pune News :पुणे : बसमध्ये विसरलेली बॅग, त्यात रोख रक्कम आणि महत्त्वाची कागदपत्रे… अशा परिस्थितीत बॅग सापडल्यावर ती प्रामाणिकपणे संबंधित प्रवाशापर्यंत पोहोचवून पीएमपीएमएलच्या दोन कर्मचाऱ्यांनी माणुसकीचे दर्शन घडविले. वाहक प्रदीप पाटील आणि चालक महेश होले यांच्या या प्रामाणिकपणाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.https://maharashtramirror.com/ Pune News

शुक्रवारी सकाळी मार्ग क्रमांक २९४ (स्वारगेट ते आळंदी) या बसवर कर्तव्य बजावत असताना वाहक प्रदीप पाटील आणि चालक महेश होले यांना एका महिलेची बॅग बसमध्ये आढळून आली. चौकशी केली असता ही बॅग आशा घसाडे यांची असल्याचे समोर आले. घसाडे या दिघी येथे बसमध्ये चढल्या होत्या. मात्र, कामाच्या गडबडीत त्या आपली बॅग बसमध्येच विसरल्या.

बॅगमध्ये आधारकार्ड, पॅनकार्ड, एटीएम कार्ड, महत्त्वाची कागदपत्रे तसेच अंदाजे अडीच हजार रुपयांची रोख रक्कम होती. कर्मचाऱ्यांनी कोणताही विलंब न करता ही बॅग स्वारगेट वाहतूक नियंत्रक होले व झुरूंगे यांच्याकडे जमा केली. त्यानंतर घसाडे यांच्याशी संपर्क साधून बॅग सापडल्याची माहिती देण्यात आली.

आशा घसाडे यांनी स्वारगेट डेपोमध्ये येऊन आपली बॅग परत घेतली. यावेळी त्यांनी प्रदीप पाटील आणि महेश होले यांचे मनापासून आभार मानले. त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल आगार व्यवस्थापक शैलेंद्र जगताप आणि असिस्टंट डेपो मॅनेजर अंकुश कदम यांनी दोघांचे कौतुक केले. पीएमपीएमएलच्या कर्मचाऱ्यांनीही त्यांच्या या कृतीचे अभिनंदन केले. :::

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

શેર કરો