મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

Pune News : पीएमपीएमएलच्या बस प्रवासात ज्येष्ठ नागरिकांना ५० टक्के सवलतपुणे

Pune News :पुणे महाराष्ट्र मिरर - महानगर परिवहन महामंडळातर्फे (पीएमपीएमएल) पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि पीएमआरडीए कार्यक्षेत्रातील प्रवाशांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

વક
વિક્રાંત કુલકર્ણી

1 મિનિટ વાંચન

पीएमपीएमएलच्या बस प्रवासात ज्येष्ठ नागरिकांना ५० टक्के सवलत
पीएमपीएमएलच्या बस प्रवासात ज्येष्ठ नागरिकांना ५० टक्के सवलत

Pune News :पुणे महाराष्ट्र मिरर - महानगर परिवहन महामंडळातर्फे (पीएमपीएमएल) पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि पीएमआरडीए कार्यक्षेत्रातील प्रवाशांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. संचालक मंडळाच्या वतीने १ नोव्हेंबर २०२६ पासून पीएमपीएमएलच्या सर्व बस मार्गांवर ज्येष्ठ नागरिकांसाठी (वय वर्षे ६० व त्यावरील) प्रवास भाडे दरात थेट ५० टक्के सवलत लागू करण्यात आली आहे. https://maharashtramirror.com Pune News

यापूर्वी पीएमपीएमएलतर्फे ७० रुपये किमतीचा ज्येष्ठ नागरिक दैनिक पास ३५ रुपयांत देण्यात येणार आहे. आता त्याव्यतिरिक्त सर्वच बस मार्गांवरील प्रवास भाडे तिकिटांमध्येही ही ५० टक्के सवलत मिळणार असल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना सार्वजनिक वाहतूक बससेवेचा लाभ अत्यंत किफायतशीर आणि सुलभ दरात घेता येणार आहे. या सवलतीचा लाभ घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी प्रवासादरम्यान वयाची खात्री पटवण्यासाठी वयाचा पुरावा म्हणून आधार कार्ड (ज्यावर पूर्ण जन्म तारीख असणे अनिवार्य आहे), पॅन कार्ड किंवा महामंडळाचे ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र सोबत बाळगणे आवश्यक आहे. या योजनेचा जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन पुणे महानगर परिवहन महामंडळामार्फत करण्यात आले आहे.https://maharashtramirror.com Pune News

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com

શેર કરો