મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

Pune News : ‘नवरात्रोत्सवासाठी पीएमपीएमएलची विशेष बससेवा; ‘मंडई मेट्रो स्टेशन’ ते ‘तळजाई देवी मंदिर’ दरम्यान धावणार बस

Pune News :पुणे, महाराष्ट्र मिरर ः नवरात्रोत्सवाच्या काळात भाविकांची होणारी गर्दी आणि त्यांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन पुणे महानगर परिवहन महामंडळ लि.

વક
વિક્રાંત કુલકર્ણી

1 મિનિટ વાંચન

‘नवरात्रोत्सवासाठी पीएमपीएमएलची विशेष बससेवा; ‘मंडई मेट्रो स्टेशन’ ते ‘तळजाई देवी मंदिर’ दरम्यान धावणार बस
‘नवरात्रोत्सवासाठी पीएमपीएमएलची विशेष बससेवा; ‘मंडई मेट्रो स्टेशन’ ते ‘तळजाई देवी मंदिर’ दरम्यान धावणार बस

Pune News :पुणे, महाराष्ट्र मिरर ः नवरात्रोत्सवाच्या काळात भाविकांची होणारी गर्दी आणि त्यांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. (पीएमपीएमएल) कडून विशेष बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही विशेष बससेवा ‘महात्मा फुले मंडई मेट्रो स्टेशन’ ते ‘तळजाई देवी मंदिर’ दरम्यान पुरवली जाणार आहे.https://maharashtramirror.com/ Pune News
११ ते २० ऑक्टोबर २०२६ या १० दिवसांच्या नवरात्रोत्सव कालावधीत ही बससेवा सुरू राहील. यासाठी मार्ग क्रमांक ‘वाय ४०’ (Y-40) निश्चित करण्यात आला आहे. ही बस गाडीखाना, शिवाजी रोड, शाहू चौक, स्वारगेट, एस.टी. कॉलनी, शिवदर्शन, लक्ष्मीनगर, सारंग सोसायटी आणि सदू शिंदे क्रिकेट स्टेडियम या मार्गाने धावेल.https://maharashtramirror.com/ Pune News
बसांच्या वेळा आणि फेऱ्यांचे नियोजन:महात्मा फुले मंडई मेट्रो स्टेशनवरून: पहिली बस सकाळी ०७:०० वाजता सुटेल, तर शेवटची बस रात्री १२:०० वाजता सुटेल. तळजाई देवी मंदिरावरून: पहिली बस सकाळी ०७:४५ वाजता सुटेल, तर शेवटची बस रात्री १२:४५ वाजता सुटेल. या बसमार्गावर दर दीड तासाने बस उपलब्ध असेल. दिवसभरात महात्मा फुले मंडई मेट्रो स्टेशनवरून ११ आणि तळजाई देवी मंदिरावरून ११ अशा एकूण २२ फेऱ्या होणार आहेत. नवरात्रात तळजाई देवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या विशेषतः महिला भाविकांनी आणि इतर सर्व नागरिकांनी या विशेष बससेवेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन पीएमपीएमएल व्यवस्थापनाकडून करण्यात आले आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

શેર કરો