PMPML: खर्चाचा डोंगर आणि थकबाकीमुळे पुणेकरांची ‘जीवनवाहिनी’ व्हेंटिलेटरवर
पुणे, महाराष्ट्र मिरर
2 મિનિટ વાંચન

PMPML: सध्या पीएमपीचा संपूर्ण कारभार हा खऱ्या अर्थाने ‘उधारी’वरच हाकला जात असल्याचे समोर आले आहे
पुणे, महाराष्ट्र मिरर
PMPML: पुणेकरांची महत्त्वाची जीवनवाहिनी मानली जाणाऱ्या पुणे महानगर परिवहन महामंडळाची (पीएमपीएमएल) आर्थिक स्थिती दिवसेंदिवस अत्यंत गंभीर बनत चालली आहे. महामंडळाचा एकूण खर्च हा उत्पन्नाच्या जवळपास दुप्पट पोहोचला असून, सध्या पीएमपीचा संपूर्ण कारभार हा खऱ्या अर्थाने ‘उधारी’वरच हाकला जात असल्याचे समोर आले आहे. प्रशासनासमोर वाढती तूट आणि थकबाकीचा डोंगर उभा ठाकल्याने आगामी काळात सार्वजनिक वाहतूक सेवा विस्कळीत होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. pmpml financial crisis debt pune bus service ventilation
थकबाकीचा वाढता डोंगर
उपलब्ध आकडेवारीनुसार, १५ जुलै २०२६ अखेर महामंडळाच्या डोक्यावर तब्बल २९९.८४ कोटी रुपयांच्या थकबाकीची टांगती तलवार कायम आहे. उत्पन्नाच्या तुलनेत खर्च कैक पटीने जास्त असल्यामुळे पीएमपी प्रशासन प्रचंड आर्थिक दबावाखाली वावरत आहे. महामंडळाचा वार्षिक खर्च सुमारे १,६१० कोटी रुपये आहे, तर या संपूर्ण सेवांमधून पीएमपीला केवळ ८१८ कोटी रुपयांचे उत्पन्न प्राप्त होते. उत्पन्नावरील ही तूट भरून काढण्यासाठी महामंडळाला पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अनुदानावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून राहावे लागत आहे. PMPML
TET : टीईटी पेपरफुटी प्रकरणातील मास्टरमाइंडला बिहारमधून जेरबंद

संचलन तुटीत अंशतः सुधारणा, मात्र खर्च अवाढव्य
प्रशासनाने उत्पन्न वाढविण्यासाठी आणि खर्चात बचत करण्यासाठी काही नवीन उपाययोजना आखल्या आहेत. उपलब्ध बसच्या माध्यमातूनच बसच्या संचलनात वाढ करण्यात आली आहे. २०२४-२५ मध्ये पीएमपीच्या बसने एकूण ११.६७ कोटी किलोमीटरचा प्रवास केला होता, तो २०२५-२६ मध्ये वाढवून १२.८८ कोटी किलोमीटरवर नेण्यात आला. यामुळे संचलन तूट ८८५.४३ कोटी रुपयांवरून काहीशी कमी होऊन ८०८.२६ कोटी रुपयांपर्यंत खाली आणण्यात प्रशासनाला यश आले असले, तरीही एकूण आर्थिक ताळेबंद अद्याप कोलमडलेलाच आहे.

महामंडळाच्या एकूण खर्चाचा ताळेबंद तपासला असता, सर्वात मोठी व चिंतेची बाब म्हणजे कर्मचाऱ्यांच्या वेतनावर होणारा अवाढव्य खर्च. पीएमपीच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनापोटी तब्बल ७९०.७६ कोटी रुपये खर्च होत आहेत. आश्चर्याची बातमी म्हणजे, हा वेतनाचा खर्च महामंडळाच्या एकूण वाहतूक उत्पन्नापेक्षाही (७१९ कोटी रुपये) जास्त आहे. याशिवाय, प्रवाशांच्या सोयीसाठी भाडेतत्त्वावर घेतलेल्या बसेसपोटी ६१९.७१ कोटी रुपये आणि इंधनासाठी १०८.७९ कोटी रुपये मोजावे लागत आहेत. वेतनावरील हा अवाढव्य खर्च आणि भाडेतत्त्वावरील बसचे महामंडळाचे कंबरडे मोडत आहेत. PMPML
PMC: अडीच कोटींचा चुराडा! जंगली महाराज रस्त्यावरील ‘ते’ मेकॅनिकल पार्किंग अखेर पाडणार
ठेकेदार आणि ‘एमएनजीएल’चे कोटींचे बिल रखडले
रोखीच्या चणचणीमुळे महामंडळाने विविध देणी रोखून धरली आहेत . ठेकेदारांचे मार्च ते जुलैदरम्यानचे तब्बल १२९ कोटी आहेत.
गॅस पुरवठा करणाऱ्या ‘एमएनजीएल’ (MNGL) कंपनीचे ६३ कोटी रुपये देणे बाकी आहे. कर्मचाऱ्यांचे तोषदान व रजा रोखीकरणाचे ५४ कोटी रुपये रखडले आहेत. वैद्यकीय देयकांचे १३ कोटी रुपये आणि बालसंगोपन अधिभाराचे १७ कोटी रुपये अद्याप प्रलंबित आहेत.

थकबाकीची रक्कम तात्काळ अदा न केल्यास भविष्यात पीएमपीची बससेवा मोठ्या प्रमाणात विस्कळीत होईल, असा इशारा ठेकेदार आणि संबंधित पुरवठादार कंपन्यांनी दिला आहे. याबाबत प्रशासनाला यापूर्वीच दोन वेळा अधिकृत पत्रे पाठवण्यात आली आहेत. त्यामुळे पुणेकरांना सुरळीत आणि खात्रीशीर सार्वजनिक वाहतूक पुरवण्यासाठी पालिका व राज्य सरकारने ठोस वित्तीय पॅकेज किंवा विशेष अनुदान देण्याची निकड निर्माण झाली आहे.
View this post on Instagram A post shared by Maharashtra Mirror (@maharashtramirrornews)
