Pune News : पीएमपीएमएल बस अपघातात मालमत्तेचे नुकसान झाल्यास मिळणार भरपाई
Pune News : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) स्वमालकीच्या तसेच खासगी कंत्राटदारांच्या बसमुळे होणाऱ्या अपघातांमध्ये वैयक्तिक अथवा सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाल्यास, संबंधित मालकांना नुकसानभरपाई देण्याच्या महत्त्वपूर्ण धोरणाला अखेर मंजुरी देण्यात आली आहे.
2 મિનિટ વાંચન

Pune News : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) स्वमालकीच्या तसेच खासगी कंत्राटदारांच्या बसमुळे होणाऱ्या अपघातांमध्ये वैयक्तिक अथवा सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाल्यास, संबंधित मालकांना नुकसानभरपाई देण्याच्या महत्त्वपूर्ण धोरणाला अखेर मंजुरी देण्यात आली आहे. पीएमपीएमएलच्या इतिहासात मालमत्तेच्या नुकसानीबाबत असे निश्चित धोरण प्रथमच अमलात आणले जात आहे. पुणे महापालिकेच्या विशेष सभेत नागरिकांच्या मालमत्तेच्या सुरक्षेचा प्रश्न गांभीर्याने उपस्थित करण्यात आला होता. त्यानंतर महापौर मंजुषा नागपुरे यांच्या विशेष पुढाकाराने झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा प्रस्ताव एकमताने मंजूर करण्यात आला. या धोरणांतर्गत आता बस अपघातात मृत पावलेल्या व्यक्तीच्या वारसांना मिळणारी आर्थिक मदत २ लाखांवरून ३ लाख रुपये करण्यात आली आहे, तर जखमींसाठीची मदत ५० हजारांऐवजी १ लाख रुपयांपर्यंत वाढविण्यात आली आहे. https://maharashtramirror.com/ Pune News
पारदर्शक मूल्यांकनासाठी स्वतंत्र कार्यपद्धती
पीएमपीएमएलच्या स्वमालकीच्या बसना ‘तृतीय पक्ष दायित्व विमा’ (थर्ड पार्टी लायबिलिटी इन्शुरन्स) उतरविण्यापासून शासनाने सूट दिली आहे. त्यामुळे यापूर्वी दुकाने, घरे, वाहने किंवा अन्य मालमत्तेचे नुकसान झाल्यास भरपाई देण्याबाबत स्पष्ट नियमावली नव्हती. मात्र, आता बाह्य संस्था किंवा तज्ज्ञांमार्फत प्रत्यक्ष नुकसानीचे मूल्यांकन केले जाणार आहे. विमा कंपन्यांच्या धर्तीवरच अधिकृत यंत्रणेमार्फत हे मूल्यांकन होऊन मदतीची रक्कम ठरवली जाईल. भरपाई स्वीकारताना संबंधित मालमत्ताधारकाकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेतले जाणार आहे. https://maharashtramirror.com/ Pune News
खासगी बस पुरवठादारांनाही नियम लागू
हे नवीन धोरण केवळ पीएमपीएमएलच्या स्वमालकीच्या बसनाच नव्हे, तर प्रवासी सेवा पुरवठा करणाऱ्या खासगी बस कंत्राटदारांनाही बंधनकारक असणार आहे. मोटार वाहन कायद्यानुसार बाधित व्यक्तीने न्यायालयात स्वतंत्र दावा दाखल केल्यास, पीएमपीएमएलने यापूर्वी दिलेली भरपाईची रक्कम न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली जाईल. न्यायालयाच्या अंतिम आदेशानुसार पूर्वी अदा केलेली रक्कम वजा करून उर्वरित भरपाई दिली जाईल.
पहिल्याच प्रकरणांत नुकसानभरपाई मंजूर
या धोरणाच्या अंमलबजावणीस सुरुवात झाली असून, २१ एप्रिल २०२६ रोजी अप्पा बळवंत चौक, प्रभात टॉकीजजवळ झालेल्या बस अपघातात नुकसान झालेल्या दोन दुकानांचे तज्ज्ञांकडून मूल्यांकन करण्यात आले. त्यानुसार ‘ओ. व्ही. शेवाडे अँड असोसिएट्स’ या शासकीय मूल्यांकनकर्त्यांच्या अहवालानुसार, ‘मे. प्रकाश कार्ड्स’चे मालक विनोद पतंगे यांना ४ लाख ७० हजार ५३१ रुपये, तर ‘बालाजी कार्ड्स’चे मालक आकाश धनसिंग नायकडा यांना ४५ हजार ९६२ रुपये नुकसानभरपाई देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यासंदर्भातील सर्व आवश्यक निर्णय व मंजुरीचे अधिकार पीएमपीएमएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक महेश आव्हाड यांना राहतील, अशी माहिती महापौर मंजुषा नागपुरे यांनी दिली आहे.
