PMC News : गृहप्रकल्पांना पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी संबंधित विकसकांचीच
महाराष्ट्र मिरर
2 મિનિટ વાંચન

PMC News : अखेर सदनिकाधारकांना पाणीपुरवठा करण्याचे हमीपत्र आता येणार पालिकेच्या संकेतस्थळावर
महाराष्ट्र मिरर
PMC News : समाविष्ट ३२ गावांमध्ये बांधकाम प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पाणी पुरवठ्याची जबाबदारी संबंधित बिल्डरची असते. पालिकेकडून पूर्णत्वाचा दाखला घेताना संबंधित बिल्डर नव्या प्रकल्पातील रहिवाशांना पाणीपुरवठा करण्यासंबंधी पालिकेस हमीपत्र देतात. प्रत्यक्षात मात्र त्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे पालिकेने हमीपत्रात स्पष्टता आणली असून त्यासंबंधीचा अहवाल आयुक्तांकडे पाठविला आहे. PMC Water Supply Housing Projects Developers

समाविष्ट गावामध्ये प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर विकसकांना हमीपत्राचा विसर पडून नागरिकांना पाणी पुरवठा केला जात नाही. परिणामी सोसायट्यांना टँकरच्या पाण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करावा लागतो. एप्रिल महिन्यात झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये नगरसेवकांनी हा प्रश्न उपस्थित करून संबंधित विकसकांवर ही पाण्याची पूर्तता करत नसल्याने कारवाईची मागणी केली होती. PMC News
Pune Crime: आंदेकर टोळीतील गुंडांचा एसटी बॉईज टोळीकडून पाठलाग; कोर्टातून बाहेर पडल्यानंतर तणाव
या पार्श्वभूमीवर पालिकेचा पाणीपुरवठा संबंधित गृहप्रकल्पांना पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी संबंधित विकसकांचीच असल्याचे पालिकेच्या बांधकाम विभागाने स्पष्ट केले होते. आता पालिकेच्या बांधकाम विभागाकडून हमीपत्रे व मंजूर बांधकाम प्रस्तावांची यादी पालिकेच्या संकेतस्थळावर ऑनलाइन उपलब्ध करून देण्याचा, हमीपत्रांसह प्रकल्पांची माहिती सार्वजनिक करण्याचा निर्णयही महापालिकेने घेतला आहे.
पुणे महापालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या ३२ गावांमधील बांधकाम प्रकल्पांमधील रहिवाशांना पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी संबंधित बांधकाम व्यावसायिकांचीच आहे. बांधकाम प्रकल्पाला महापालिकेकडून परवानगी घेताना बांधकाम व्यावसायिकांनी जे हमीपत्र दिले आहे त्याचे पालन करावे, असे पुणे महापालिकेचे शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर यांनी सांगितले आहे.
RMC : पुण्यात वीकेंडला आरएमसी मिक्सर वाहनांना प्रवेश; कॅमेरा, मद्यतपासणीसह कडक सुरक्षा नियम
हात झटकने नवीन नाही
समाविष्ट गावांमधील विकासकांनी महापालिकेला हमीपत्र देऊन पाणीपुरवठ्याची जवाबदारी स्वीकारली. परंतु नंतर विकासकांनी हात वर केल्याने सोसायट्यांना पाण्यासाठी महिन्याकाठी लाखो रुपये मोजावे लागत आहेत. याबाबत समाविष्ट गावांतील काहींनी न्यायालयात धाव घेतली होती. परंतु संबंधित प्रकल्पांमधील रहिवाशांसाठी सोसायटी स्थापन झाल्यावर १०० पैकी ९९ विकसक पाणी पुरवठा करण्याचे आश्वासन पाळत नाहीत, ही वस्तुस्थिती असल्याचे नगरसेवक सचिन दोडके यांच्यासह अनेक नगरसेवकांनी महापालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले. मात्र अद्याप कोणावरच कारवाई झाली नाही. PMC News

Pune News : बांधकाम व्यावसायिकाची ११.२८ कोटी रुपयांची फसवणूक
अखेर धोरण तयार
बांधकाम प्रकल्पांमधील रहिवाशांना पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी स्वीकारल्यावरच व तसे हमीपत्र सादर केल्यानंतरच बांधकाम पूर्णत्वाचा दाखला दिला जातो; परंतु नागरिकांना याची कल्पना नसते. त्यामुळे या हमीपत्रात आणखी स्पष्टता आणण्यासाठी पालिका धोरण तयार करेल असे महापालिकेने सांगितले होते. आज अखेर याबाबतचा अहवाल महापालिका आयुक्त यांच्याकडे सादर झाला आहे. पण आता या धोरणाची अंमलबजावणी कितपत केली जाणार ययाकडे सर्वांचे लक्ष आहे.

