PMC Fraud : महापालिकेत 'टॅक्स' कपातीचे आमिष दाखवून ६ लाखांचा गंडा
पुणे, महाराष्ट्र मिरर
1 મિનિટ વાંચન

PMC Fraud : महापालिका अधिकाऱ्याचा नातेवाईक असल्याचे सांगून ६ लाखांची फसवणूक; शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
पुणे, महाराष्ट्र मिरर
PMC Fraud : महापालिका अधिकाऱ्याचा पुतण्या असल्याचे सांगून एका व्यक्तीची ६ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीने सरकारी अधिकाऱ्याच्या नावाचा गैरवापर करून फिर्यादीचा विश्वास संपादन केला होता. ( PMC Fraud Civic Official Relative Man Booked 6 Lakh )

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी संतोष गंगाराम नाईक (वय ४४, रा. चऱ्होली बुद्रुक, पुणे) हे महापालिकेच्या कामानिमित्त २० मार्च २०२६ रोजी शिवाजीनगर येथील महापालिका कार्यालयात गेले होते. यावेळी आरोपी विजेंद्र हनुमंत पवार (मो. नं. ९८८१२५९३२२) याने फिर्यादीची भेट घेतली. आरोपीने स्वतःला महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन कार्यालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याचा पुतण्या असल्याचे सांगितले. ( PMC Fraud )
Moshi Tragedy : मृतांच्या वारसांना आर्थिक मदत मिळण्यास प्रारंभ

आरोपीने फिर्यादीचा विश्वास संपादन करून, मी तुमचे टॅक्स (कर) कमी करून देतो, असे आमिष दाखवले. या मोबदल्यात त्याने फिर्यादीकडून ६ लाख रुपये उकळले. मात्र, नंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादीने पोलिसांत धाव घेतली. ( PMC Fraud )
या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलिसांनी आरोपी विजेंद्र हनुमंत पवार याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१८(२) आणि ३१८(४) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विकास काठे करत आहेत.

नागरिकांनी अशा प्रकारे सरकारी कामाचे आमिष दाखवणाऱ्या भामट्यांपासून सावध राहावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
View this post on Instagram A post shared by Maharashtra Mirror (@maharashtramirrornews)
