મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

PMC : “तारीख पे तारीख… ''नगरसेविका ऐश्वर्या पठारे यांचा थेट प्रशासनाला सात दिवसांचा अल्टिमेटम

पुणे, महाराष्ट्र मिरर

ધઓ
ધનશ્રી ઓતારી

2 મિનિટ વાંચન

PMC

PMC : प्रत्येक प्रभाग समितीमध्ये पोटतिडकीने सांगूनदेखली काहीच फरक पडत नसल्याने अखेर नगरसेविका संतापल्या

पुणे, महाराष्ट्र मिरर

विमाननगरमधील नगर रोडवरील पादचारी सबवेच्या (पदमजूर भुयारी मार्ग) अत्यंत दयनीय आणि दुर्लक्षित स्थितीबद्दल वॉर्ड क्र. ३ च्या नगरसेविका ऐश्वर्या सुरेंद्र पठारे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. प्रशासनाचे वारंवार लक्ष वेधूनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने त्यांनी महापालिका प्रशासनाला सात दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. तसेच, प्रत्येक प्रभाग समितीमध्ये पोटतिडकीने सांगतोय भुयारी मार्ग दुरुस्त करा पण वॉर्ड ऑफिसला फरक पडत नाही…अशा शब्दात त्यांनी प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर संताप व्यक्त केला आहे. PMC

याबाबत सोशल मीडियावर एक आक्रमक पोस्ट शेअर करत नगरसेविका पठारे यांनी प्रशासनाच्या दिरंगाईचा पर्दाफाश केला आहे. “तारीख पे तारीख…! मी नगरसेविका म्हणून निवडून आल्यानंतर पहिल्याच आठवड्यात नगर रोडवरील या सबवेची पाहणी केली होती. त्याच्या दुरुस्तीसाठी आणि सीसीटीव्ही बसवण्यासाठी बजेटमध्ये तरतूदही करण्यात आली असून वॉर्ड ऑफिससोबत बैठकही पार पडली. दोन्ही प्रभाग समितीच्या बैठकांमध्ये अधिकाऱ्यांना सबवे दुरुस्त करण्याबाबत वारंवार सांगितले. केवळ आश्वासनांची खैरात वाटली गेली, पण आज परिस्थिती जैसे थे च आहे” असे त्या म्हणाल्या.

MPSC विद्यार्थ्यांचा पुण्यात महाआक्रोश

स्थानिक नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न एरणीवर आला असून, पठारे यांच्यासह अन्य तीन स्थानिक लोकप्रतिनिधींनी प्रशासनावर ताशेरे ओढले आहेत. सबवेचे शटर तातडीने काढून रस्ता पूर्णपणे स्वच्छ करण्यात यावा, अशी मागणी करत त्यांनी सांगितले की, “आम्ही चार नगरसेवक प्रशासनाला अंतिम इशारा देत आहोत — सबवेचे शटर काढा आणि रस्ता स्वच्छ ठेवा. कोणतीही मोठी दुर्घटना घडण्याची वाट पाहू नका.” PMC

प्रशासकीय अनास्थेमुळे नागरिकांचे हाल होत असल्याचे सांगत पठारे यांनी एका प्रसंगी स्वतः पुढाकार घेतल्याचेही नमूद केले. “आम्ही स्वतः तिथे उपस्थित राहून भुयारी मार्ग साफ करून घेतला. पण वॉर्ड ऑफिसला दररोजच्या देखभालीचे साधे कामही जमणार नाही का?” असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच, सौंदर्यीकरण किंवा इतर दत्तक योजना राबवण्यापूर्वी हा सबवे पूर्ण क्षमतेने सुरू करणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “हा सबवे पूर्णक्षमतेने कार्यरत झालाच पाहिजे, त्यानंतर सौंदर्यीकरणाचा विचार करू, पण आधी किमान मूलभूत स्वच्छता आणि दुरुस्ती तर करा!” असे त्या आक्रमकपणे म्हणाल्या. pmc

View this post on Instagram A post shared by Aishwarya Surendra Pathare (@aishwarya08pathare)

नगर रोडवरील 'स्व. रवींद्र गलांडे पाटील सबवे' स्वच्छता, पुरेशी प्रकाशयोजना (लाईटिंग) आणि नियमित देखभालीच्या अभावामुळे दिर्घकाळ वापराविना पडून आहे. परिणामी, जीव धोक्यात घालून नागरिकांना अत्यंत वर्दळीचा नगर रोड रस्ता ओलांडवा लागत आहे. फेब्रुवारी २०२६ मध्ये पदभार स्वीकारल्यानंतर लगेचच पठारे यांनी या सुविधेची पाहणी करून दुरुस्तीला प्राधान्य देण्याची मागणी केली होती. मात्र, अद्यापही परिस्थिती सुधारली नसल्याने आता केवळ पोकळ आश्वासने नको, तर तात्काळ प्रत्यक्षात कृती हवी, अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली आहे. pmc

શેર કરો