Pune News : हत्येच्या गुन्ह्यात ५२ वर्षीय महिलेला जामीन; पिंपरी-चिंचवड अतिरिक्त सत्र न्यायालयाचा आदेश
Pune News : पिंपरी-चिंचवड, महाराष्ट्र मिरर : सांगवी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खुनाच्या गुन्ह्यात आरोपी सेल्वराज राजंगम (वय ५२) यांना पिंपरी-चिंचवड येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
2 મિનિટ વાંચન

Pune News : पिंपरी-चिंचवड, महाराष्ट्र मिरर : सांगवी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खुनाच्या गुन्ह्यात आरोपी सेल्वराज राजंगम (वय ५२) यांना पिंपरी-चिंचवड येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. आरोपीच्या वैद्यकीय स्थितीचा अहवाल, कोठडीतील कालावधी आणि तपासाची सद्यस्थिती विचारात घेऊन न्यायालयाने हा आदेश दिला.https://maharashtramirror.com/ Pune News
आरोपीविरुद्ध सांगवी पोलीस ठाण्यात सी.आर. क्रमांक ३०३/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१) तसेच शस्त्रास्त्र कायद्याच्या कलम २५(४) आणि २७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.https://maharashtramirror.com/ Pune News
मालमत्तेच्या वादातून हल्ल्याचा आरोप
अभियोजनाच्या कथनानुसार, २८ जून २०२६ रोजी पहाटेच्या सुमारास मालमत्तेच्या वादातून तसेच सातत्याने होत असलेल्या त्रासाच्या पार्श्वभूमीवर आरोपीने संबंधित व्यक्तीवर दगड आणि लोखंडी विळ्याने हल्ला केल्याचा आरोप आहे. घटनेनंतर आरोपी स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाली आणि शस्त्रासह आत्मसमर्पण केले होते.आरोपीच्या वतीने अॅड. प्रसाद विराज निकम आणि अॅड. मन्सूर तांबोळी यांनी जामीन अर्ज दाखल केला होता.
पूर्वनियोजित हेतू नसल्याचा बचाव पक्षाचा युक्तिवाद
बचाव पक्षाने न्यायालयात युक्तिवाद करताना आरोपी ५२ वर्षांची महिला असून तिची वैद्यकीय स्थिती गंभीर स्वरूपाची असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. तिला नियमित वैद्यकीय उपचार आणि देखभालीची आवश्यकता असल्याचेही सांगण्यात आले.
घटनेपूर्वी मृत व्यक्तीकडून सातत्याने त्रास, शिवीगाळ आणि धमक्या दिल्या जात असल्याचा तसेच घटनेच्या वेळी आरोपीवर हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याचा दावा बचाव पक्षाने केला. त्यामुळे आरोपीने स्वतःच्या संरक्षणासाठी कृती केली असून खून करण्याचा पूर्वनियोजित हेतू नव्हता, असा युक्तिवाद करण्यात आला. खाजगी संरक्षणाच्या अधिकाराचा अतिरेक झाला की नाही, हा मुद्दा पुराव्यांच्या आधारेच निश्चित होऊ शकतो, असेही बचाव पक्षाने मांडले.
तपासात सहकार्य केल्याचा दावा
आरोपीने स्वेच्छेने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले असून तपासात सहकार्य केल्याचे बचाव पक्षाने सांगितले. संबंधित शस्त्र पोलिसांनी जप्त केले असून पुढील महत्त्वाची जप्ती किंवा शोध बाकी नसल्याचेही न्यायालयाच्या निदर्शनास आणण्यात आले. तपास अंतिम टप्प्यात असून आरोपीविरुद्ध यापूर्वी कोणताही गुन्हेगारी रेकॉर्ड नसल्याचेही बचाव पक्षाने नमूद केले.
अभियोजन पक्षाने मात्र जामिनास विरोध केला. आरोपीने खाजगी संरक्षणाचा अधिकार ओलांडल्याचा दावा करत मालमत्तेचा वाद अद्याप सुरू असल्याने भविष्यात पुन्हा वाद निर्माण होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले. तसेच आरोपीकडून साक्षीदारांवर दबाव आणला जाण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली.
वैद्यकीय स्थिती आणि तपासाचा विचार
न्यायालयाने आदेशात आरोपीची वैद्यकीय स्थिती आणि त्यासंदर्भातील अहवाल रेकॉर्डवर असल्याचे नमूद केले. आरोपीने स्वतः पोलीस ठाण्यात हजर होऊन आत्मसमर्पण केले असून संबंधित शस्त्र जप्त झाले आहे. तसेच तपास बर्याच अंशी पूर्ण होऊन अंतिम टप्प्यात असल्याचेही न्यायालयाच्या निदर्शनास आले. या सर्व बाबींचा विचार करून न्यायालयाने आरोपीला जामीन मंजूर केला.
२५ हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन
न्यायालयाने आरोपीला २५ हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर आणि त्याच रकमेच्या एका जामीनदाराच्या हमीवर मुक्त करण्याचे आदेश दिले. तसेच कायदा व सुव्यवस्था राखणे, साक्षीदारांवर कोणत्याही प्रकारे दबाव न आणणे, राहत्या पत्त्याची माहिती देणे आणि न्यायालयाच्या पूर्वपरवानगीशिवाय निवासस्थान न बदलणे अशा अटी घालण्यात आल्या आहेत. हा आदेश अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एस. नायर यांनी ३० सप्टेंबर २०२६ रोजी खुल्या न्यायालयात दिला. बचाव पक्षातर्फे अॅड. प्रसाद विराज निकम यांना अॅड. पृथ्वीजित माने, अॅड. शिवानी वाघमारे, अॅड. श्रुती फडे, अॅड. पूनम कोळेकर आणि अॅड. समीक्षा शेळके यांनी सहकार्य केले.
