મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

Pimpri-Chinchwad News: पिंपरी -चिंचवड परिसरात विविध गुन्ह्यांची नोंद

पिंपरी -चिंचवड परिसरात विविध गुन्ह्यांची नोंद

વક
વિક્રાંત કુલકર્ણી

2 મિનિટ વાંચન

पिंपरी -चिंचवड परिसरात विविध गुन्ह्यांची नोंद
पिंपरी -चिंचवड परिसरात विविध गुन्ह्यांची नोंद

Pimpri-Chinchwad News: पिंपरी, महाराष्ट्र मिरर प्रतिनिधी : पिंपरी - चिंचवड परिसरात विविध गुन्ह्यांची संबंधित पोलिस ठाण्यात नोंद झाली असून, आरोपींना अटक करण्यात आली आहे.https://maharashtramirror.com/

वादातून एकाचा खून

कासारसाई-कुसगाव रोडवरील कृष्ण मंदिरापुढील वनविभागाच्या जागेत मयत हनुमंत सोपान शितोळे (रा. कासारसाई, ता. मुळशी, जि. पुणे) आणि आरोपी जयवंता भगवंत तिडके (वय ५०) दारू पीत बसले होते. भांडणादरम्यान हनुमंत यांनी आरोपीचा हात पिरगळल्याने संतप्त झालेल्या जयवंताने तेथील दगड त्यांच्या डोक्यात आणि छातीत मारून हनुमंत यांची हत्या केली. याप्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून, आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.https://maharashtramirror.com/ Pimpri-Chinchwad News

हफ्त्यासाठी ट्रॅव्हल्सच्या कार्यालयात तोडफोड

भुजबळ चौक येथील ‘डॉलफिन ट्रॅव्हल्स’च्या कार्यालयात आरोपी वकास काळे (वय २८) याने बेकायदेशीर प्रवेश केला. त्याने कॉम्प्युटर, प्रिंटर, कॅमेरा, वायफाय आणि फिर्यादीचा मोबाईल तोडून दरमहा ५० हजार रुपयांच्या हप्त्याची मागणी करत जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला .https://maharashtramirror.com/ Pimpri-Chinchwad News

पार्किंगच्या वादातून तरूणाला मारहाण

काळाखडक लाईफ श्री सोसायटीसमोर गाडी पार्क करण्याच्या वादातून एका अज्ञात दुचाकी चालक आणि रिक्षा चालकाने (रिक्षा क्र. MH 14 LS 8175) शौर्य पाटील (वय २०, रा. उद्योगनगर, चिंचवड, पुणे) याला लाकडी दांडक्याने मारहाण करून दुखापत केली. याप्रकरणी संबंधितांवर वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. https://maharashtramirror.com/ Pimpri-Chinchwad News

कारचालकाला शिवीगाळ

मुंबइ - पुणे एक्सप्रेसवेवर परंदवडी ब्रिजजवळ फोरच्युनर कार (MH 05 GE 1008) मधील अज्ञात तीन ते चार इसमांनी फिर्यादी शाहुराज टिके यांच्या कारला थांबण्याचा इशारा करत शिवीगाळ केली. तसेच, निष्काळजीपणे गाडी चालवून त्यांच्या कारला धडक दिली. यात फिर्यादी गंभीर जखमी झाले असून कारचे मोठे नुकसान झाले आहे. याप्रकरणी शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. https://maharashtramirror.com/ Pimpri-Chinchwad News

पार्किंगमधून दुचाकी लंपास

वराळे येथील डी. वाय. पाटील कॉलेज शेजारील ओंकार पॅराडाईज बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये हँडल लॉक करून पार्क केलेली ६० हजार रुपये किमतीची होंडा युनिकॉर्न दुचाकी (MH 14 NB 2722) चोरट्याने लंपास केली. याप्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. https://maharashtramirror.com/ Pimpri-Chinchwad News

गांजा बाळगणारा अटकेत

पिंपरीत एच.ए. मैदानाजवळ बेकायदेशीरपणे ८ हजार १०० रुपये किमतीचा १६२ ग्रॅम गांजा बाळगणाऱ्या विजय बन्सीलाल कुर्मी (वय ३६) याला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी संत तुकारामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. https://maharashtramirror.com/ Pimpri-Chinchwad News

શેર કરો