Pimpri Chinchawad Crime News : स्पा चालकांकडून खंडणी घेताना साप्ताहिकाच्या पत्रकाराला अटक
पिंपरी-चिंचवड, महाराष्ट्र मिरर : Pimpri Chinchawad Crime News | स्पा सेंटर सुरू ठेवायचे असल्यास ५० हजार रुपयांची खंडणी देण्याची मागणी करून पैसे न दिल्यास वृत्तपत्रात बातमी छापून व्यवसाय बंद पाडण्याची तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपावरून साप्ताहिक ‘वंचित सामना’च्या पत्रकाराला पिंपरी-चिंचवड ग
1 મિનિટ વાંચન

स्पा चालकाकडे ५० हजारांची मागणी; १० हजार रुपये स्वीकारताना सापळा, २.७७ लाखांचा मुद्देमाल जप्त | Pimpri Chinchawad Crime News
पिंपरी-चिंचवड, महाराष्ट्र मिरर : Pimpri Chinchawad Crime News | स्पा सेंटर सुरू ठेवायचे असल्यास ५० हजार रुपयांची खंडणी देण्याची मागणी करून पैसे न दिल्यास वृत्तपत्रात बातमी छापून व्यवसाय बंद पाडण्याची तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपावरून साप्ताहिक ‘वंचित सामना’च्या पत्रकाराला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने सापळा रचून पकडले. १० हजार रुपयांची खंडणी स्वीकारताना रहाटणी येथे ही कारवाई करण्यात आली. आरोपीकडून रोख रकमेसह एकूण २ लाख ७७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अक्षय अरुण वाघमारे (वय ३५, रा. खडकी, पुणे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पत्रकाराचे नाव आहे. Pimpri Chinchawad Crime News | Maharashtra Mirror
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पेंढारी हे रहाटणीतील ‘अर्थ स्पा सेंटर’चे चालक आहेत. वाघमारे यांनी या स्पा सेंटरबाबत ‘डायल ११२’वर फोन करून पोलिसांना खोटी माहिती दिली आणि मानसिक त्रास दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. स्पा सेंटर सुरू ठेवायचे असल्यास ५० हजार रुपये द्यावेत, अन्यथा वृत्तपत्रात बातमी प्रसिद्ध करून व्यवसाय बंद पाडू, अशी धमकी दिल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.
तक्रार मिळाल्यानंतर खंडणीविरोधी पथकाने तिची पडताळणी केली. आरोपीकडून तक्रारदाराला वारंवार फोन करून तसेच प्रत्यक्ष भेटून खंडणीची मागणी होत असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचला.

गुरुवारी (दि. ९) रहाटणीतील जगताप डेअरी चौकातील साई कॉर्नर येथे दोन पंचांसमक्ष १० हजार रुपये स्वीकारताना वाघमारे याला पोलिसांनी पकडले. त्याच्याकडून रोख रक्कम, मोबाइल, ‘वंचित सामना’चे ओळखपत्र आणि होंडा कंपनीची कार असा एकूण २ लाख ७७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी काळेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ६२२/२०२६ नुसार भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०८(२) आणि ३०८(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी आणि जप्त मुद्देमाल पुढील कारवाईसाठी काळेवाडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे.
ही कारवाई वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणीविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र पाटील आणि त्यांच्या पथकाने केली.
