મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

Fellowship News : बार्टी अधिछात्रवृत्तीवरून विद्यार्थी आक्रमक

पुणे, महाराष्ट्र मिरर Fellowship News : डॉ.

વઝ
વિદુલા ઝગડે

1 મિનિટ વાંચન

Fellowship News : बार्टी अधिछात्रवृत्तीवरून विद्यार्थी आक्रमक

१९ ऑगस्टपासून मागण्यांसाठी बेमुदत आंदोलन

पुणे, महाराष्ट्र मिरर Fellowship News : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) अंतर्गत पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांच्या प्रलंबित अधिछात्रवृत्तीच्या प्रश्नावरून विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्या आहेत. नव्याने स्थापन झालेल्या ‘‘आंबेडकराईट स्टुडंट असोसिएशन’ च्या शिष्टमंडळाने सोमवारी (दि. १०) समाजकल्याण आयुक्त दीपा मुधोळ-मुंडे यांची भेट घेऊन बार्टी अधिछात्रवृत्ती (BANRF) संदर्भातील विविध मागण्यांवर चर्चा केली. तसेच, या मागण्यांवर सकारात्मक निर्णय न झाल्यास १९ ऑगस्टपासून बेमुदत धरणे आंदोलन करण्याचाही इशारा दिला आहे.Fellowship News

या चर्चेत ‘आंबेडकराईट स्टुडंट असोसिएशन’च्या वतीने राहुल डंबाळे, राहुल ससाने, अक्षय कांबळे, सिद्धार्थ ओव्हाळ, सुरेखा मेश्राम, प्रथमेश सूर्यवंशी आणि नितीन आंधळे सहभागी झाले. त्यांनी संशोधक विद्यार्थ्यांच्या समस्या आणि मागण्यांची बाजू प्रशासनासमोर मांडली.Fellowship News

बार्टी अधिछात्रवृत्तीच्या जागांची संख्या सध्या केवळ शंभर ठेवण्यात आली आहे. ही संख्या वाढवून किमान सहाशे करण्यात यावी, तसेच अधिछात्रवृत्तीसाठी लागू असलेली ३५ वर्षांची वयोमर्यादा पूर्णपणे रद्द करण्यात यावी, अशी प्रमुख मागणी विद्यार्थ्यांनी आयुक्तांसमोर मांडली. पीएच.डी. संशोधनासाठी वयाची अट लावल्याने अनेक पात्र आणि गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक संधींपासून वंचित राहावे लागत असल्याचा मुद्दाही शिष्टमंडळाने उपस्थित केला.

दरम्यान, १२ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आलेल्या विशेष बैठकीत विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर ठोस आणि सकारात्मक निर्णय न झाल्यास १९ ऑगस्ट २०२६ पासून पुण्यातील समाजकल्याण आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे. शैक्षणिक संधींमधील कथित भेदभाव आणि जाचक अटींविरोधात महाराष्ट्रातील मागासवर्गीय संशोधक विद्यार्थी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी होतील, असा दावा संघटनेने केला आहे.Fellowship News

विशेष बैठकीत ठोस चर्चा अपेक्षित

विद्यार्थ्यांच्या मागण्यांची गंभीर दखल घेत समाजकल्याण आयुक्त दीपा मुधोळ-मुंडे यांनी या विषयावर पुढील निर्णय घेण्यासाठी बुधवार, १२ ऑगस्ट २०२६ रोजी बार्टीचे निबंधक आणि संबंधित अधिकाऱ्यांसोबत विशेष बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत अधिछात्रवृत्तीच्या जागा, वयोमर्यादा आणि विद्यार्थ्यांच्या इतर प्रलंबित प्रश्नांवर ठोस चर्चा होण्याची अपेक्षा आहे.Fellowship News

Fellowship News

શેર કરો