મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

Petrol News : E20 पेट्रोलच्या सक्तीविरोधात पुण्यात रणशिंग!

पुणे, महाराष्ट्र मिरर Petrol News : E20 पेट्रोलच्या सक्तीच्या वापरावरून वाहनधारकांमध्ये वाढत असलेल्या नाराजीला आता संघटित आवाज मिळणार आहे.

વઝ
વિદુલા ઝગડે

1 મિનિટ વાંચન

Petrol News : E20 पेट्रोलच्या सक्तीविरोधात पुण्यात रणशिंग!

१४ ऑगस्टला राज्यस्तरीय ‘टाऊन हॉल’

पुणे, महाराष्ट्र मिरर Petrol News : E20 पेट्रोलच्या सक्तीच्या वापरावरून वाहनधारकांमध्ये वाढत असलेल्या नाराजीला आता संघटित आवाज मिळणार आहे. या पेट्रोलमुळे वाहनांमध्ये समस्या निर्माण होत असल्याने वाहनचालकांना चांगलाच भुर्दंड बसत असल्याचा दावा करत, या धोरणाविरोधात शुक्रवारी, १४ ऑगस्ट रोजी पुण्यात महाराष्ट्र राज्यस्तरीय ‘टाऊन हॉल’ आयोजित करण्यात आला आहे.Petrol News

विजय कुंभार, डॉ. अभिजीत मोरे, अमित म्हस्के, मुकुंद किर्दत, रविराज काळे, संजय कोने, सुदर्शन जगदाळे आणि धनंजय बेनकर यांनी पत्रकार परिषदेत या कार्यक्रमाची माहिती दिली. हा कार्यक्रम १४ ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजता पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन, घोले रोड, शिवाजीनगर, पुणे येथे होणार असून, सर्वांसाठी खुला असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले. तसेच, या कार्यक्रमात ऑनलाइनही सहभाग घेता येणार आहे.

वाहनचालक, मेकॅनिक, नागरिक आणि अन्य हितधारक यावेळी आपले अनुभव, समस्या आणि प्रश्न सरकारसमोर मांडणार आहेत.पेट्रोलमध्ये इथेनॉलचे मिश्रण वाढल्यानंतरही पेट्रोलच्या किमती कमी का झाल्या नाहीत?, कमी मायलेजमुळे वाहनधारकांचा प्रत्यक्ष इंधनखर्च वाढत असल्यास त्याची जबाबदारी कोणाची?, तसेच जुन्या वाहनांवर E20 चा परिणाम काय होतो?, असे प्रश्न या टाऊन हॉलमध्ये उपस्थित केले जाणार आहेत.Petrol News

E20 धोरणाची अंमलबजावणी पुरेशी पूर्वतयारी न करता आणि वाहनधारकांना पुरेसा कालावधी न देता करण्यात आली का? वाहनधारकांचे आर्थिक नुकसान होत असल्यास त्याची भरपाई कोण करणार,? असे प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आले. E20 धोरणाच्या परिणामांबाबतचे अहवाल व आकडेवारी सरकारने सार्वजनिक करावी, अशी मागणीही आयोजकांकडून करण्यात येणार आहे.

शेतकऱ्यांच्या हितासाठी E20 धोरण राबविले जात असल्याचा दावा केला जात असताना, प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या उत्पन्नात किती वाढ झाली, याचाही हिशेब सरकारने द्यावा, अशीही मागणीही यावेळी करण्यात आली. भारत-अमेरिका व्यापार चर्चेच्या पार्श्वभूमीवर अमेरिकन इथेनॉलच्या आयातीबाबत सरकारची भूमिका काय आहे, हा मुद्दाही चर्चेत येणार आहे.Petrol News

E20 पेट्रोलच्या धोरणाबाबत भारताने घेतलेल्या धोरणाबाबत या कार्यक्रमात प्रश्न उपस्थित केले जाणार आहेत. वाहनधारकांचे हित, वाहनांची कार्यक्षमता आणि देखभाल खर्च यांचा पुरेसा विचार करूनच धोरणाची अंमलबजावणी झाली का?, याबाबत सरकारला जाब विचारण्याची भूमिका आयोजकांनी घेतली आहे.Petrol News

શેર કરો