Mumbai News : मोटारसायकल चोरी करणाऱ्या सराईत अज्ञातांना पेल्हार पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाचा दणका; 2 जण जेरबंद
Mumbai News :वसई :- पेल्हार पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोटारसायकल चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांवर पेल्हार पोलिसांनी मोठी धडक कारवाई केली आहे.
1 મિનિટ વાંચન

Mumbai News : वसई फाट्यातून पळवलेली रॉयल एनफील्ड बुलेट व इतर मोटारसायकल जप्त; 4 गुन्ह्यांची उकल
Mumbai News :वसई :- पेल्हार पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोटारसायकल चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांवर पेल्हार पोलिसांनी मोठी धडक कारवाई केली आहे. 26 ऑगस्ट दरम्यान सिटीझन हॉटेलच्या बाजूला, रजा सलोडेड अंगला, वसई फाटा, वसई पूर्व येथे उभी केलेली रॉयल एनफील्ड हंटर 350 मोटारसायकल अज्ञात इसमाने चोरली होती. याप्रकरणी फिर्यादी शाबाबआलम अल्लाफ हुसेन खान (वय 34) यांनी दिलेल्या तक्रारीवरून पेल्हार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.https://maharashtramirror.com/ mumbai news
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी शोधले चोरटे;मालेगावमधून आवळल्या मुसक्या
वरिष्ठांच्या आदेशानुसार गुन्हे प्रकटीकरण पथकाने घटनास्थळाला भेट देऊन कौशल्यपूर्ण तपास केला आणि घटनास्थळावरील तसेच मार्गावरील सीसीटीव्ही फुटेजची कसून तपासणी केली. ही मोटारसायकल मालेगाव, जि. नाशिक येथील रमजानपुरा भागात नेल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर गुपत बातमीदारांच्या मदतीने पोलिसांनी आरोपी आसिफ इकबाल मोहम्मद सहूद ऊर्फ आसिफ टेलर (वय 34) आणि सय्यद हुसेन सय्यद हबीब ऊर्फ सोनू (वय 28) या सराईत गुन्हेगारांना शिताफीने ताब्यात घेतले. आरोपी आसिफ हा वाहन चोरीसाठी भिवंडी येथे येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यावरून पोलिसांनी सापळा रचून त्याला जेरबंद केले.
4 गुन्ह्यांची उकल; चोरीला गेलेल्या मोटारसायकल हस्तगत
अटक केलेल्या आरोपींकडून चोरीला गेलेली बुलेट मोटारसायकल तसेच इतर दोन सुझुकी बर्गमन कंपन्यांच्या मोटारसायकल असा एकूण ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. या आरोपींकडून अशा प्रकारे आणखी 4 गुन्ह्यांची उकल करण्यात आली असून, ते सध्या न्यायिक कोठडीत आहेत. ही धडक कारवाई पोलीस उपायुक्त परिमंडळ-3 वसई शशिकांत बोराटे, सहाय्यक पोलीस आयुक्त तानाजी बरडे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पेल्हार पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकाऱ्यांनी पार पाडली आहे.
