મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

PCMC NEWS : पिंपरी-चिंचवडमध्ये शस्त्र परवान्यांवर मोठी कारवाई

राष्ट्रवादीच्या माजी प्रभाग सदस्यासह १५ जणांचे परवाने रद्द

PG
Prashik Ghaste

1 મિનિટ વાંચન

PCMC NEWS : पिंपरी-चिंचवडमध्ये शस्त्र परवान्यांवर मोठी कारवाई

राष्ट्रवादीच्या माजी प्रभाग सदस्यासह १५ जणांचे परवाने रद्द

पिंपरी PCMC NEWS: शस्त्र परवानाधारकांविरोधात मोठी कारवाई करत पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी माजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्वीकृत प्रभाग सदस्यासह १५ जणांचे पिस्तुल परवाने रद्द केले आहेत.PCMC NEWS

शस्त्राचा दुरुपयोग, विविध गुन्ह्यांतील सहभाग, मंजुरीनंतर मुदतीत शस्त्र खरेदी न करणे तसेच वृद्धत्व किंवा मृत्यू झाल्याच्या कारणांमुळे ही कारवाई करण्यात आली आहे.

नवीन अर्ज केलेल्या ६८ जणांचे अर्जही फेटाळले
याशिवाय, नवीन शस्त्र परवाना मिळविण्यासाठी अर्ज केलेल्या ६८ जणांचे अर्जही फेटाळण्यात आले आहेत. संबंधित अर्जदारांकडे शस्त्र परवाना देण्यासाठी आवश्यक आणि सबळ कारणे नसल्याचे चौकशीत आढळून आले.PCMC NEWS

पोलिसांच्या माहितीनुसार, मयूर भोईर, सुभाष सपकाळ, विजय लांडे, साहिल ढमाले आणि शांताराम चव्हाण या पाच परवानाधारकांवर शस्त्राचा दुरुपयोग केल्याचे तसेच विविध प्रकारचे गुन्हे दाखल असल्याचे निदर्शनास आले. पोलीस आयुक्तांच्या आदेशानंतर करण्यात आलेल्या प्राथमिक चौकशीत हे आरोप सिद्ध झाल्याने त्यांचे परवाने रद्द करण्यात आले.

तसेच मंजुरी मिळाल्यानंतरही विहित कालावधीत शस्त्र खरेदी न करणाऱ्या दोन व्यक्तींचे परवाने रद्द करण्यात आले. याशिवाय वृद्धत्व आलेले किंवा मृत्यू झालेल्या आठ परवानाधारकांचे परवानेही रद्द करण्यात आले. त्यामुळे एकूण रद्द झालेल्या शस्त्र परवान्यांची संख्या १५ वर पोहोचली आहे.PCMC NEWS

नवीन शस्त्र परवान्यासाठी आलेल्या अर्जांचीही सखोल छाननी करण्यात आली. यामध्ये ६८ अर्जदारांकडे शस्त्र बाळगण्याची आवश्यक गरज किंवा पुरेसे कारण नसल्याचे आढळल्याने त्यांचे अर्ज नामंजूर करण्यात आले.

भविष्यातही अशाच प्रकारची कठोर कारवाई सुरू राहणार
शस्त्र परवान्यांच्या बाबतीत पोलीस आयुक्तालयाने कठोर धोरण स्वीकारले असून, शस्त्रांचा गैरवापर रोखण्यासाठी भविष्यातही अशाच प्रकारची कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.PCMC NEWS

रद्द करण्यात आलेल्या परवानाधारकांमध्ये विजय लांडे यांचा समावेश असून ते तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी-चिंचवड महापालिकेतील माजी स्वीकृत प्रभाग सदस्य होते. ही कारवाई केवळ कायदेशीर व प्रशासकीय निकषांच्या आधारे करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

PCMC NEWS

શેર કરો