મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

PCMC NEWS: विषारी दारूकांडातील मृतांची संख्या २५ वर

वायसीएम रुग्णालयातील अजून एक रुग्णाचा मृत्यू; फुगेवाडीतील १७ तर पुण्यातील आठ नागरिकांचा समावेश

PG
Prashik Ghaste

1 મિનિટ વાંચન

PCMC NEWS: विषारी दारूकांडातील मृतांची संख्या २५ वर

वायसीएम रुग्णालयातील अजून एक रुग्णाचा मृत्यू; फुगेवाडीतील १७ तर पुण्यातील आठ नागरिकांचा समावेश

पिंपरी: फुगेवाडी विषारी दारूकांड प्रकरणात मंगळवारी (३ जून) आणखी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता या प्रकरणातही मृतांचा आकडा २५ वर पोहचला असून यात फुगेवाडीतील १७ तर पुण्यातील आठ नागरिकांचा समावेश आहे.PCMC NEWS

प्रफुल्ल अरिकस्वामी (वय २७) असे मृत्यू झालेल्या रुग्णाचे नाव आहे. त्यांच्यावर वायसीएम रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. मंगळवारी दुपारी उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. सध्या वायसीएम रुग्णालयामध्ये श्रीमंत कोळी (वय ६०) प्रकाश राठोड (वय ६५), जितू शेदातपुरी (वय ३१), सोनू तायडे (वय वय ३०) यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर, औंध जिल्हा रुग्णालयात चंदन कुमार (वय २६), खाजप्पा शिंगे (वय ३५) आणि पवन चव्हाण (वय ३५) यांच्यावर उपचार सुरू आहेत. तसचे अस्लम खान (वय ४०) यांच्यावर ससून रुग्णालयात तर, सुभाष डिग्गीकर (वय ६६) यांच्यावर मेडिपॉइंट रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वायसीएम तसेच जिल्हा रुग्णालयात नव्याने एकही रुग्ण दाखल झालेला नाही. PCMC NEWS

PCMC NEWS

શેર કરો