पाणीटंचाईतही पीसीएमसी प्रशासनाचा गलथान कारभार उघड
आकुर्डीत लाखो लिटर पाणी वाया खोदकाम करताना जलवाहिनी फोडली !
1 મિનિટ વાંચન

आकुर्डीत लाखो लिटर पाणी वाया खोदकाम करताना जलवाहिनी फोडली !
पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरातील आकुर्डी परिसरात महापालिकेच्या कामकाजावर गंभीर प्रश्न उपस्थित करणारी घटना समोर आली आहे. शहरात एकीकडे पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आलेला असताना, दुसरीकडे सुरू असलेल्या कामादरम्यान पाणीपुरवठ्याची मुख्य पाईपलाईन फुटून लाखो लिटर पाणी वाया गेल्याचा प्रकार घडला आहे.

ही घटना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कामादरम्यान ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे घडल्याचे समोर येत असून, प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. पाईपलाईन फुटल्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून, रस्त्यांवरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.
PCMC administration's mismanagement exposed even during water shortage
