મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

Paternity Leave पुरुष सरकारी कर्मचाऱ्यांनाही मिळणार १५ दिवसांची पितृत्व रजा

तामिळनाडू सरकारचा मोठा निर्णय!

સ્મિતા કુલકર્ણી
સ્મિતા કુલકર્ણી

2 મિનિટ વાંચન

Paternity Leave
Paternity Leave

Paternity Leave चेन्नई : महिलांप्रमाणेच आता पुरुषांनाही पालकत्वाची जबाबदारी पार पाडण्यासाठी विशेष रजा मिळणार आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांनी पुरुष सरकारी कर्मचाऱ्यांसाठी १५ दिवसांच्या पितृत्व रजेची (Paternity Leave) घोषणा केली आहे. राज्य सरकारने पहिल्यांदाच हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यामुळे नवजात बाळाची काळजी घेण्यासाठी आणि प्रसूतीच्या काळात पत्नीला आधार देण्यासाठी पुरुष कर्मचाऱ्यांना वेळ मिळणार आहे.

कधी घेता येणार १५ दिवसांची रजा?

तामिळनाडू सरकारच्या अधिकृत प्रसिद्धीपत्रकानुसार, विवाहित पुरुष सरकारी कर्मचाऱ्यांना १५ दिवसांची पितृत्व रजा घेता येणार आहे. विशेष म्हणजे, ही रजा कधी घ्यायची याबाबत कर्मचाऱ्यांना पर्याय देण्यात आला आहे. मुलाच्या जन्माच्या अपेक्षित तारखेच्या १५ दिवस आधी किंवा बाळाच्या जन्मानंतर सहा महिन्यांच्या आत ही रजा घेता येईल. त्यामुळे प्रसूतीपूर्व आणि प्रसूतीनंतरच्या काळात पत्नीला मदत करणे तसेच नवजात बाळाची काळजी घेणे वडिलांना शक्य होणार आहे.

कर्मचाऱ्यांच्या मागणीला सरकारचा सकारात्मक प्रतिसाद

पुरुष सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पितृत्व रजेची तरतूद करण्यात यावी, अशी मागणी अनेक दिवसांपासून केली जात होती. या मागणीची दखल घेत राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. प्रसूतीचा काळ हा आई आणि बाळ या दोघांसाठीही अत्यंत महत्त्वाचा असतो. या काळात आईला शारीरिक आणि मानसिक आधार देण्याबरोबरच नवजात बाळाच्या संगोपनात वडिलांचा सहभागही तितकाच आवश्यक आहे, अशी भूमिका सरकारने प्रसिद्धीपत्रकातून मांडली आहे.

महिला कर्मचाऱ्यांना मिळते ३६५ दिवसांची प्रसूती रजा

दरम्यान, तामिळनाडूमध्ये महिला सरकारी कर्मचाऱ्यांना यापूर्वीपासूनच ३६५ दिवसांची प्रसूती रजा दिली जाते. ऑगस्टमध्ये तिसऱ्या अपत्याची अपेक्षा असलेल्या महिला कर्मचाऱ्यांसाठीही प्रसूती रजा १२ आठवड्यांवरून ३६५ दिवसांपर्यंत वाढवण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. आता पुरुष कर्मचाऱ्यांसाठी १५ दिवसांची पितृत्व रजा लागू करण्याचा निर्णय घेतल्याने पालकत्वाच्या जबाबदारीत वडिलांचाही सहभाग वाढवण्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

શેર કરો
સ્મિતા કુલકર્ણી

રિપોર્ટર-સબએડિટર

મહારાષ્ટ્ર મિરર