મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

Panvel News : प्रजापती म्यॅग्नम महिला समूह तर्फे पारंपारीक मंगळागौर उत्साहात संपन्न.

उरण : हिंदू संस्कृतीचे पारंपारीक सण मंगळागौर सण आजच्या धावपळीच्या युगातही प्रकर्षाने साजरे होताना पूर्ण महाराष्ट्रात पहावयास मिळते.उरण तालुक्यातील द्रोणागिरी नोड येथील प्रजापती म्यॅगनम वसाहत मध्ये मंगळागौर सण मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.

વ
વિવેક

1 મિનિટ વાંચન

Panvel News : प्रजापती म्यॅग्नम महिला समूह तर्फे पारंपारीक मंगळागौर उत्साहात संपन्न.

उरण : हिंदू संस्कृतीचे पारंपारीक सण मंगळागौर सण आजच्या धावपळीच्या युगातही प्रकर्षाने साजरे होताना पूर्ण महाराष्ट्रात पहावयास मिळते.उरण तालुक्यातील द्रोणागिरी नोड येथील प्रजापती म्यॅगनम वसाहत मध्ये मंगळागौर सण मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. नित्य नियमित होणारे महिला अत्याचार, बलात्कार यावरून धार्मिकता आणि हिंदू संस्कृती लोप पावत चालली आहे. त्यामुळे काळाला अनुसरून संस्कार आणि संस्कृती जतन करणे आवश्यक आहे. याउद्देशाने मंगळागौरचे आयोजन प्रजापती म्यॅगन इमारती मध्ये करण्यात आले. गौरीच्या रूपात पेहराव, साज श्रुगार करून गौरीचे पूजा समूह नृत्य, झिम्मा, विविध फुगडी प्रकार , पिंगा, सासू सुनेचे भांडण, नाच ग घुमा, घागर घुमू दे, या पारंपारीक नृत्याने वसाहत दुमदूमली होती.
मंगळागौर सणामुळे मैत्रीचे स्नेहधागे बांधून एक संस्कृतीचा वसा पुढच्या पिढीला साकार केला गेला . यावेळी या कार्यक्रमाला महिलांचा उस्फुर्त प्रतिसाद पाहायला मिळाला.सहभोजनाचा आस्वाद घेत मंगळागौर कार्यक्रमाच्या रूपरेषेची सांगता झाली.अशा प्रकारे प्रजापती म्यॅग्नम महिला समूह आयोजित मंगळागौर सण मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.

हेही वाचा: Sanjay Raut : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना "जय शिवाजी" म्हणण्याचा अधिकार नाही, औरंगजेबाशी संबंध जोडून संजय राऊत यांच्यावर निशाणा.

हेही वाचा: Sanjay Nirupam : उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या फोटोला जोडे मारल्याने संजय निरुपम संतापले.

શેર કરો