Panvel News : करंजाडे सेक्टर 3 परिसरात आढळला मृतदेह
पनवेल महाराष्ट्र मिरर : पनवेलजवळील करंजाडे सेक्टर 3 येथील साईटवर एका इसमाचा मृतदेह आढळून आला असून त्याच्या नातेवाईकांचा शोध पनवेल शहर पोलीस करीत आहेत.
વ
વિવેક
1 મિનિટ વાંચન

पनवेल महाराष्ट्र मिरर : पनवेलजवळील करंजाडे सेक्टर 3 येथील साईटवर एका इसमाचा मृतदेह आढळून आला असून त्याच्या नातेवाईकांचा शोध पनवेल शहर पोलीस करीत आहेत. Panvel Police Station सदर इसमाचे अंदाजे वय 40 वर्षे, डोक्याचे केस काळे पांढरे, दाढी मिशी वाढलेली, बांधा सडपातळ, उंची 5 फुट असून, अंगात पिवळ्या रंगाचा हाफ टी शर्ट व काळ्या रंगाची पॅन्ट घातलेली आहे. या इसमाबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास त्यांनी पनवेल शहर पोलीस ठाणे दुरध्वनी 022-27452333 किंवा सहा.पो.नि.सारिका झांझुर्णे यांच्याशी संपर्क साधावा.
