Delhi News : सणासुदीत कांदा रडवणार
Delhi News : नवी दिल्ली / मुंबई: आगामी सण-उत्सवांचा काळ सुरू होण्यापूर्वीच देशभरात कांद्याच्या दराने पुन्हा एकदा मोठी उसळी घेतली आहे.
3 મિનિટ વાંચન

Delhi News : १५ दिवसांत भाव दुप्पट, १०० रुपयांचा टप्पा ओलांडण्याची शक्यता
Delhi News : नवी दिल्ली / मुंबई: आगामी सण-उत्सवांचा काळ सुरू होण्यापूर्वीच देशभरात कांद्याच्या दराने पुन्हा एकदा मोठी उसळी घेतली आहे. अवघ्या १५ दिवसांत कांद्याचे किरकोळ बाजारातील दर दुप्पट झाले असून, त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला मोठा फटका बसत आहे. देशातील विविध कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक घटल्यामुळे ही दरवाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.https://maharashtramirror.com/ Delhi News
१५ दिवसांत भाव ३५ वरून ८० वर
गेल्या १५ दिवसांपूर्वी बाजारात ३५ रुपये प्रतिकिलो मिळणारा कांदा आता थेट ७० ते ८० रुपये प्रतिकिलोवर पोहोचला आहे. देशाची राजधानी दिल्लीत कांद्याचे दर ३० रुपयांवरून ७५ ते ८० रुपये प्रतिकिलोवर गेले आहेत. केवळ गेल्या ४८ तासांतच कांद्याच्या भावात किलोमागे १० ते १५ रुपयांची वाढ नोंदवण्यात आली आहे.https://maharashtramirror.com/ Delhi News
मुसळधार पावसाचा आवक व साठ्यावर परिणाम
कांद्याच्या या भीषण दरवाढीमागे अवकाळी व मुसळधार पाऊस हे मुख्य कारण मानले जात आहे. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि बिहार या प्रमुख उत्पादक राज्यांमध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.
साठ्याचे नुकसान: पावसामुळे शेतकऱ्यांनी साठवून ठेवलेला कांदा सडला आहे.
पिकाचे नुकसान: पावसामुळे कांदा खराब होण्याच्या भीतीने शेतकऱ्यांनी वेळेआधीच काढणी केली, तर सुमारे २५ टक्के कांदा शेतातच भिजून खराब झाल्याने सोडून द्यावा लागला आहे.https://maharashtramirror.com/ Delhi News
गुजरातसह विविध बाजार समित्यांमध्ये आवक घटली
महाराष्ट्रातून व मध्य प्रदेशातून होणारा पुरवठा विस्कळीत झाल्याने गुजरातसह देशातील अनेक मोठ्या बाजार समित्यांमध्ये कांद्याची दैनंदिन आवक लक्षणीयरीत्या घटली आह. सध्या ज्या भागांतून पुरवठा होत आहे, तिथेही पावसाची परिस्थिती असल्याने आवक आणखी मंदावण्याची चिन्हे आहेत.https://maharashtramirror.com/ Delhi News
कांदा १०० रुपयांच्या पार जाण्याची भीती
बाजारात मागणी वाढली असून त्या तुलनेत पुरवठा खूपच कमी पडत आह. जर बाजारातील हीच परिस्थिती कायम राहिली आणि आवक आणखी घटली, तर येत्या काही दिवसांत कांद्याचा भाव प्रतिकिलो १०० रुपयांचा टप्पा ओलांडू शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. सण-उत्सवांच्या तोंडावर झालेली ही दरवाढ गृहिणींचे आणि सर्वसामान्यांचे बजेट कोलमडवणारी ठरत आहे.https://maharashtramirror.com/ Delhi News
साखरेचे दर वाढले, उसालाही जादा भाव द्या; ऊस उत्पादक आक्रमक
गेल्या काही महिन्यांत साखरेच्या किमतीत ४० टक्क्यांहून अधिक वाढ झाल्याचा शेतकऱ्यांचा दावा; २०२५-२६ हंगामातील उसासाठी अतिरिक्त दराची मागणी https://maharashtramirror.com/ Delhi News
साखरेच्या बाजारभावात गेल्या काही महिन्यांत मोठी वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर आता ऊस उत्पादकांनीही उसाला जादा दर देण्याची मागणी पुढे केली आहे. साखरेच्या किमती ४० टक्क्यांहून अधिक वाढल्या असतील तर त्याचा आर्थिक फायदा केवळ साखर कारखान्यांपुरता मर्यादित न राहता ऊस उत्पादकांपर्यंतही पोहोचला पाहिजे, अशी भूमिका शेतकऱ्यांकडून मांडली जात आहे. त्यामुळे २०२५-२६ च्या गळीत हंगामातील उसाच्या अंतिम दराचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.https://maharashtramirror.com/ Delhi News
ऊस तोडणी, वाहतूक, मजुरी, खते, कीटकनाशके आणि शेतीच्या इतर खर्चात सातत्याने वाढ होत असल्याने ऊस उत्पादनाचा खर्चही वाढला आहे. दुसरीकडे साखरेच्या बाजारभावात वाढ झाल्याने कारखान्यांना मिळणाऱ्या उत्पन्नात सुधारणा होत असल्याचा शेतकऱ्यांचा दावा आहे. त्यामुळे साखर विक्रीतून मिळणाऱ्या वाढीव उत्पन्नाचा योग्य हिस्सा ऊस उत्पादकांना देण्यात यावा, अशी मागणी जोर धरत आहे. https://maharashtramirror.com/ Delhi News
केंद्र सरकारकडून उसासाठी दरवर्षी रास्त आणि किफायतशीर दर (FRP) निश्चित केला जातो. मात्र बाजारातील साखरेचे दर, कारखान्यांचे उत्पन्न आणि उपपदार्थांमधून मिळणारा महसूल विचारात घेऊन FRPपेक्षा अधिक दर देण्याची क्षमता कारखान्यांकडे असल्याचे ऊस उत्पादकांचे म्हणणे आहे. विशेषतः साखरेच्या दरातील वाढ लक्षात घेऊन २०२५-२६ हंगामासाठी अतिरिक्त रक्कम जाहीर करावी, अशी मागणी पुढे येत आहे. https://maharashtramirror.com/ Delhi News
‘वाढीव उत्पन्नात शेतकऱ्यांनाही वाटा द्या’
साखरेबरोबरच इथेनॉल, मळी, बगॅस आणि अन्य उपपदार्थांमधूनही साखर उद्योगाला उत्पन्न मिळते. त्यामुळे कारखान्यांची आर्थिक स्थिती आणि प्रत्यक्ष साखर विक्रीचा दर यांचा आढावा घेऊन शेतकऱ्यांना अधिक मोबदला देण्याची मागणी होत आहे. साखरेच्या वाढलेल्या किमतींचा फायदा ऊस उत्पादकांनाही मिळाला पाहिजे, असा शेतकरी संघटनांचा आग्रह आहे. https://maharashtramirror.com/ Delhi News
आगामी गळीत हंगामाच्या पार्श्वभूमीवर उसाचा दर हा पुन्हा महत्त्वाचा मुद्दा ठरण्याची चिन्हे आहेत. कारखान्यांनी वाढीव दराबाबत सकारात्मक निर्णय न घेतल्यास ऊस उत्पादकांकडून दबाव वाढण्याची शक्यता असून, त्यामुळे राज्यातील साखर पट्ट्यात या मागणीवरून वातावरण तापण्याची शक्यता आहे. https://maharashtramirror.com/ Delhi News
