મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

बावधनमध्ये एकाला २८ लाखांचा गंडा

गुंतवणुकीवर मोठ्या नफ्याचे आमिष दाखवले

PG
Prashik Ghaste

1 મિનિટ વાંચન

बावधनमध्ये एकाला २८ लाखांचा गंडा

गुंतवणुकीवर मोठ्या नफ्याचे आमिष दाखवले

पिंपरी: शेअर मार्केट किंवा इतर गुंतवणुकीवर ५ ते २० टक्के नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून बावधन येथील एका नागरिकाची २८ लाख २६ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. ही घटना १५ मार्च ते २१ एप्रिल २०२६ या कालावधीत बावधन येथे घडली.

याप्रकरणी टीना मल्होत्रा आणि सानिका गोखले यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित व्यक्तीने याप्रकरणी १२ मे रोजी बावधन पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ मार्च रोजी आरोपींनी फिर्यादी यांना फोन केला. आरोपींनी फिर्यादीचा विश्वास संपादन करून त्यांना गुंतवणुकीवर ५ ते २० टक्के नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवले. त्यांच्या सांगण्यावरून फिर्यादीने एकूण २८ लाख २६ हजार रुपये गुंतवले. मात्र, आरोपींनी मूळ रक्कम किंवा त्यावर मिळणारा नफा परत न करता फिर्यादीची आर्थिक फसवणूक केली. बावधन पोलीस तपास करत आहेत.

શેર કરો