Pune Crime : जुन्या सांगवीत बँक कर्मचारी असल्याचे भासवून महिलेची फसवणूक
Pune Crime :पिंपरी: बँक कर्मचारी असल्याचे भासवून कारचे लोन फोरक्लोज करण्याचे सांगत एका महिलेची दोन लाख २२ हजार ४७४ रुपयांची फसवणूक करण्यात आली.
1 મિનિટ વાંચન

Pune Crime : कार लोन फोरक्लोजरच्या नावाखाली लुबाडले सव्वा दोन लाख
Pune Crime :पिंपरी: बँक कर्मचारी असल्याचे भासवून कारचे लोन फोरक्लोज करण्याचे सांगत एका महिलेची दोन लाख २२ हजार ४७४ रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना मार्च २०२५ ते २९ सप्टेंबर २०२६ या कालावधीत जुनी सांगवी येथील द्रोण पार्क, पवार नगर येथे घडली. https://maharashtramirror.com/ Pune Crime
या प्रकरणात ४४ वर्षीय महिलेने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार श्रुतीक सदानंद कासारे (रा. ठाणे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने फिर्यादीला फोन करून स्वतः एच.डी.एफ.सी. बँक बंडगार्डन शाखेचा कर्मचारी असल्याचे भासवले. कारचे लोन फोरक्लोज करून देतो असे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला. https://maharashtramirror.com/ Pune Crime
त्यानंतर वेळोवेळी वेगवेगळ्या खात्यांवर एकूण २ लाख २२ हजार ४७४ रुपये घेऊन कारचे लोन क्लोज न करता त्या रकमेचा अपहार केला. पैसे परत करण्यासाठी वारंवार संपर्क साधला तरीही कोणतीही रक्कम परत न करता फसवणूक केली. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.
