Pune News : फरार आरोपी निलेश घायवळची मकोका न्यायालयातून निर्दोष मुक्तता
Pune News पुणे, महाराष्ट्र मिरर : फरार आरोपी निलेश घायवळ याच्यासह त्याच्या सर्व साथीदारांची विशेष ‘मकोका’ न्यायालयाने सबळ पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता केली आहे.
1 મિનિટ વાંચન

Pune News पुणे, महाराष्ट्र मिरर : फरार आरोपी निलेश घायवळ याच्यासह त्याच्या सर्व साथीदारांची विशेष ‘मकोका’ न्यायालयाने सबळ पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता केली आहे. आरोपी देशाबाहेर फरार असताना अशा प्रकरणात न्यायालयातून निर्दोष सुटका होणे ही एक दुर्मिळ घटना मानली जात आहे.https://maharashtramirror.com/ Pune News
नेमके प्रकरण काय होते?
मिळालेल्या माहितीनुसार, २०२० मध्ये निलेश घायवळ एका दुसऱ्या प्रकरणात कारागृहात असताना, त्याचा साथीदार संतोष धुमाळ याने भावाच्या रॅलीसाठी जीप हवी असल्याचे सांगून फिर्यादीकडे खंडणीची मागणी केल्याचा आरोप करण्यात आला होता. गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांनी हा गुन्हा उघडकीस आणला होता. मात्र, हे प्रकरण समोर आल्यानंतर लगेचच फिर्यादीने पोलिसांवर आणि तपास यंत्रणेवर गंभीर आरोप केले. तपास यंत्रणेने आपल्यावर दबाव आणून ही फिर्याद नोंदवून घेतल्याचे प्रतिज्ञापत्र फिर्यादीने न्यायालयात सादर केले होते. याशिवाय, उच्च न्यायालयात रीट याचिका दाखल करून फिर्यादीने आपली बाजू मांडली होती. यावर उच्च न्यायालयाने पोलिसांच्या तपासावर कडक ताशेरे ओढत फिर्यादीचा पुनश्च जबाब नोंदवण्याचे आदेश दिले होते. त्या जबाबातही फिर्यादीने घडलेला संपूर्ण घटनाक्रम नाकारून अशी कोणतीही घटना घडली नसल्याचे स्पष्ट केले होते.https://maharashtramirror.com/ Pune News
विशेष मकोका न्यायाधीश साळुंखे यांच्या न्यायालयात या खटल्याची सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान फिर्यादीने शपथेवर आपली फिर्याद फेटाळून लावली. पोलिसांनी दबाव आणून तक्रार नोंदवल्याचे सांगत त्याने घटनेचा इन्कार केला. तसेच या प्रकरणात सादर केलेले इतर सर्व साक्षीदार आणि पंचही फितूर झाल्याने (घटनेला पाठिंबा न दिल्याने) न्यायालयाने पुराव्याअभावी सर्व आरोपींना दोषमुक्त केले.
या खटल्यात आरोपी निलेश घायवळच्या वतीने ज्येष्ठ वकील विपुल दुशिंग, मुसा शेख याच्या वतीने ॲड. रितेश गदादे, अक्षय गोगावले याच्या वतीने ॲड. अनिश पाडेकर, कुणाल कंधारेच्या वतीने ॲड. बिलाल मणियार तर संतोष धुमाळ व विपुल माझीरे यांच्यासाठी ॲड. सलमान पठाण यांनी काम पाहिले. दरम्यान "न्यायालयाचा हा निकाल सुदृढ व निष्पक्ष न्यायव्यवस्थेचे प्रतीक आहे." अशी प्रतिक्रिया आरोपींचे वकील ॲड. विपुल दुशिंग यांनी व्यक्त केली आहे. निलेश घायवळ व त्याच्या टोळीवर नुकतेच दाखल झालेल्या इतर गुन्ह्यांविरोधातॲड. विपुल दुशिंग यांच्यामार्फत उच्च न्यायालयात रीट याचिका दाखल करण्यात आलेल्या आहेत.
