મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

Pimpri News : निगडीत २५ हजारांच्या एमडी ड्रग्जसह तरुणाला अटक

Pimpri News पिंपरी: विक्रीसाठी २५ हजार रुपये किमतीचा 'एमडी' (मॅफेड्रॉन) हा अंमली पदार्थ बाळगणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे.

વક
વિક્રાંત કુલકર્ણી

1 મિનિટ વાંચન

निगडीत २५ हजारांच्या एमडी ड्रग्जसह तरुणाला अटक अज्ञात साथीदारावरही गुन्हा केला दाखल
निगडीत २५ हजारांच्या एमडी ड्रग्जसह तरुणाला अटक अज्ञात साथीदारावरही गुन्हा केला दाखल

Pimpri News : अज्ञात साथीदारावरही गुन्हा केला दाखल

Pimpri News पिंपरी: विक्रीसाठी २५ हजार रुपये किमतीचा 'एमडी' (मॅफेड्रॉन) हा अंमली पदार्थ बाळगणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई रविवारी (२० सप्टेंबर) सकाळी ११.२० वाजण्याच्या सुमारास निगडीतील अंकुश चौकाजवळ, भक्ती शक्ती रोडवर करण्यात आली.

या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल रंगनाथ म्हस्के यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार किशोर विकास नकले (२२, निगडी, मूळ- उमरगा, धाराशिव) याला अटक करण्यात आली असून त्याच्या एका अज्ञात साथीदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीकडे २५ हजार रुपये किमतीचा ५ ग्रॅम एमडी ड्रग्ज, मोबाईल व इतर असा एकूण ४० हजार २० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. हा अंमली पदार्थ त्याने तळेगाव येथून एका अनोळखी व्यक्तीकडून आणल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

શેર કરો