મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

कळंब येथे नॅशनल डेव्हलपमेंट फाउंडेशन च्या वतीने भव्य रक्तदान शिबिर

कळंब दि.१२(प्रतिनिधी) कळंब येथे दर वर्षी प्रमाणे याही वर्षी ईद-ए-मिलाद व गणेश उत्सव निमित्त नॅशनल डेव्हलपमेंट फाउंडेशन द्वारे रक्त दान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

DM
Deepak Mali

1 મિનિટ વાંચન

कळंब येथे नॅशनल डेव्हलपमेंट फाउंडेशन च्या वतीने भव्य रक्तदान शिबिर

कळंब दि.१२(प्रतिनिधी) कळंब येथे दर वर्षी प्रमाणे याही वर्षी ईद-ए-मिलाद व गणेश उत्सव निमित्त नॅशनल डेव्हलपमेंट फाउंडेशन द्वारे रक्त दान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या वेळी रक्त दान शिबीराचे उद्घाटन आमदार मा.कैलास (दादा) घाडगे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी प्रमुख उपस्थिती अतुल गायकवाड,प्रदीप मेटे, शाम नाना खबाले,सागर बाराते,प्रा.दिलीप पाटील,बालाजी (बप्पा) जाधवर यांची उपस्थिती होती. दर वर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तारेख मिर्झा, इस्माईल हन्नुरे,शहाजहान शिकलगार,सुलेमान मिर्झा यांच्या मार्गदर्शन खाली जावेद सौदागर, इम्रान मिर्झा, इम्रान खान,अमजद मिर्झा,मकसुद शिकलगार,अतुल माने,लियाकत बागवान,वसीम चौधरी,तय्यब सय्यद यांनी परिश्रम घेतले.

શેર કરો