મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

Nashik News : नाशिकमध्ये भाजपला खिंडार! दोन माजी महापौरांचा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश

Nashik Latest News : अशोक मुर्तडक आणि दशरथ पाटील यांच्या पक्षप्रवेशाने नाशिकमध्ये शिवसेनेची ताकद दुणावली; ठाण्यातील 'शुभ दीप'वर सोहळा संपन्न

વ
વિવેક

1 મિનિટ વાંચન

Nashik News : नाशिकमध्ये भाजपला खिंडार! दोन माजी महापौरांचा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश

Nashik Latest News : अशोक मुर्तडक आणि दशरथ पाटील यांच्या पक्षप्रवेशाने नाशिकमध्ये शिवसेनेची ताकद दुणावली; ठाण्यातील 'शुभ दीप'वर सोहळा संपन्न

नाशिक | नाशिक महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलेला असतानाच नाशिकच्या राजकारणातील दोन मोठे चेहरे एकनाथ शिंदेंच्या गळाला लागले आहेत. भाजपमध्ये असलेल्या अशोक मुर्तडक आणि दशरथ पाटील यांनी आज ठाण्यातील उपमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी भगवा हाती घेतला. या पक्षप्रवेशामुळे नाशिकमध्ये भाजपला मोठे भगदाड पडले असून शिवसेनेची बाजू भक्कम झाली आहे.

તસવીરો · 1/2

Arrow Keys ⟵ ⟶

बंडखोरीनंतर मुर्तडकांचा 'धनुष्यबाण' हाती

अशोक मुर्तडक हे नाशिकमध्ये मनसेची सत्ता असताना महापौर होते. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र, आगामी निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक-6 मधून भाजपने उमेदवारी नाकारल्याने मुर्तडक कमालीचे नाराज होते. त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्जही दाखल केला होता. अखेर उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्याशी संवाद साधत त्यांना शिवसेनेत खेचून आणण्यात यश मिळवले आहे.

मुलासाठी दशरथ पाटलांची घरवापसी

माजी महापौर दशरथ पाटील यांनीही आज अधिकृतपणे शिवसेनेत प्रवेश केला. त्यांचे चिरंजीव प्रेम पाटील यांना शिवसेनेने आधीच प्रभाग क्रमांक-9 मधून उमेदवारी दिली आहे. मुलगा शिवसेनेचा अधिकृत उमेदवार असताना वडील भाजपमध्ये राहिल्याने राजकीय वर्तुळात पेच निर्माण झाला होता. अखेर आज दशरथ पाटील यांनीही शिवसेनेचा झेंडा हाती धरत मुलाच्या प्रचारासाठी कंबर कसली आहे.

नाशिकच्या रणधुमाळीत नवी समीकरणे

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दोन्ही नेत्यांचे स्वागत करताना म्हटले की, "नाशिकच्या विकासासाठी अनुभवी नेत्यांची गरज आहे. या दोन दिग्गज नेत्यांच्या आगमनामुळे नाशिक महानगरपालिकेत शिवसेनेचा भगवा दिमाखात फडकणार यात शंका नाही."

શેર કરો