મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

Nashik news: सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी प्रशासनाची तयारी वेगात; ‘शून्य अपघात’चे उद्दिष्ट

१५ डिसेंबरपर्यंत आपत्ती व्यवस्थापन आराखडे पूर्ण करण्याचे कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांचे निर्देश; गर्दी, अग्निसुरक्षा आणि वाहतूक व्यवस्थापनावर भर

સ્મિતા કુલકર્ણી
સ્મિતા કુલકર્ણી

2 મિનિટ વાંચન

सिंहस्थ कुंभमेळा
सिंहस्थ कुंभमेळा

नाशिक, महाराष्ट्र मिरर : २०२७ मध्ये होणारा नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा सुरक्षित आणि अपघातमुक्त पार पाडण्यासाठी प्रशासनाने तयारीला वेग दिला आहे. कुंभमेळ्यात लाखो भाविक सहभागी होण्याची शक्यता लक्षात घेऊन संभाव्य आपत्ती टाळणे, गर्दीचे नियोजन आणि आपत्कालीन यंत्रणा सक्षम करण्यावर भर दिला जात आहे. या पार्श्वभूमीवर सर्व शासकीय विभागांनी १५ डिसेंबर २०२६ पूर्वी आपापले आपत्ती व्यवस्थापन आराखडे पूर्ण करावेत, असे निर्देश कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांनी दिले आहेत. ‘शून्य अपघात’ हेच प्रशासनाचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

आपत्ती व्यवस्थापनाच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाच्या कार्यालयात बैठक घेण्यात आली. यावेळी विविध शासकीय यंत्रणांनी विभागनिहाय आपत्ती व्यवस्थापन आराखड्यांचे सादरीकरण केले. संभाव्य धोके ओळखणे, प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि आपत्कालीन परिस्थितीत करावयाच्या कार्यवाहीवर चर्चा झाली.

कुंभमेळ्यादरम्यान गर्दीचे नियंत्रण, अग्निसुरक्षा, अखंडित पाणीपुरवठा, स्वच्छता, सार्वजनिक सुविधा आणि पायाभूत सुविधांची सुरक्षितता यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. तसेच अंतर्गत आणि बाह्य वाहनतळ, पार्किंग क्षमता आणि भाविकांच्या सुरक्षित वाहतुकीचे नियोजन करण्यावरही भर देण्यात आला.

औद्योगिक सुरक्षिततेच्या दृष्टीने कारखान्यांमधील धोकादायक रसायने व वायूंचे उत्पादन, साठवणूक आणि वाहतूक यांचाही आढावा घेण्यात आला. रसायनगळती, आग किंवा स्फोट यांसारख्या घटनांना प्रतिबंध करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर चर्चा झाली.

आपत्कालीन परिस्थितीत विविध विभागांमधील समन्वय, संपर्क व्यवस्था, मनुष्यबळ, वाहने, यंत्रसामग्री आणि स्वयंसेवकांची उपलब्धता यांचाही विचार करण्यात आला. आवश्यक प्रशिक्षण आणि प्रात्यक्षिक सराव घेण्याबाबतही सूचना देण्यात आल्या. सर्व विभागांनी सक्षम आराखडे तयार करून त्यांची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे आयुक्त शेखर सिंह यांनी स्पष्ट केले आहे.

શેર કરો
સ્મિતા કુલકર્ણી

રિપોર્ટર-સબએડિટર

મહારાષ્ટ્ર મિરર