Nalasopra Crime News : नालासोपारा हत्याकांडातील मुख्य आरोपी गजाआड; विरार गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई, अन्य 3 गुन्हेगारांच्याही आवळल्या मुसक्या
Nalasopra Latest Crime News : बिगशो'सह हत्येतील 3 आरोपींना बेड्या; तांत्रिक तपासाच्या आधारे विरार गुन्हे शाखा कक्ष-3 ने लावला छडा
2 મિનિટ વાંચન

Nalasopra Latest Crime News : बिगशो'सह हत्येतील 3 आरोपींना बेड्या; तांत्रिक तपासाच्या आधारे विरार गुन्हे शाखा कक्ष-3 ने लावला छडा
विरार,नालासोपारा :- नालासोपारा येथे मागील भांडणाच्या रागातून शुभम ऊर्फ बाबा मिश्रा याची निर्घृण हत्या करणाऱ्या मुख्य आरोपींसह, खुनाचा प्रयत्न आणि दरोड्याच्या गुन्ह्यात फरार असलेल्या अन्य तीन सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात विरार गुन्हे शाखा कक्ष-3 Virar Crime Branch Unit 3 ला मोठे यश आले आहे. या कारवाईमुळे नालासोपारा आणि परिसरात दहशत माजवणाऱ्या टोळ्यांना पोलिसांनी मोठा दणका दिला आहे. Nalasopra Latest Crime News
भररस्त्यात केली होती हत्या
20 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री नालासोपारा पश्चिमेकडील पंचमुखी हनुमान मंदिराजवळ शुभम मिश्रा याला आरोपींनी घेरले होते. जुन्या वादाचे निमित्त काढून रोशन सिंग, सुनील मालुसरे ऊर्फ बिगशो, जगन परकटियार आणि त्यांच्या साथीदारांनी शुभमवर चाकू आणि दगडाने भीषण हल्ला केला होता. या हल्ल्यात शुभमचा जागीच मृत्यू झाला होता. याप्रकरणी नालासोपारा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
अशी झाली अटक
पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) आणि सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा कक्ष-3 चे पोलीस निरीक्षक शाहूराज रणवरे यांच्या पथकाने समांतर तपास सुरू केला. तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 2 मार्च रोजी सुनील मालुसरे ऊर्फ 'बिगशो' याला ताब्यात घेतले. त्यानंतर 8 मार्च रोजी या हत्येतील अन्य दोन प्रमुख आरोपी जगन परकटियार आणि शरण मुरगण यांनाही पोलिसांनी जेरबंद केले.
तपासात इतर फरार गुन्हेगारही सापडले
आरोपी जगन परकटियार याचा शोध घेत असताना पोलिसांना आणखी तीन पाहिजे असलेले आरोपी मिळून आले. हे तिघेही आचोळे आणि वालीव पोलीस ठाण्यातील खुनाचा प्रयत्न (307) आणि दरोड्याच्या गुन्ह्यात गेल्या काही काळापासून फरार होते.
1.अजय अमोद मिश्रा: खुनाचा प्रयत्न आणि दरोडा प्रकरणातील आरोपी.
2.प्रिषीत ऊर्फ दीपक पाल: विविध गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी.
3.सनी ऊर्फ अभिषेक टाक: आचोळे पोलीस ठाण्यातील गुन्ह्यात पाहिजे असलेला आरोपी.
या तिन्ही आरोपींना पुढील कारवाईसाठी आचोळे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. एका खुनाच्या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांनी इतर तीन गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपींना अटक करून उत्कृष्ट कामगिरी केली आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त निकेत कौशिक, अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे आणि पोलीस उप-आयुक्त संदीप डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली विरार गुन्हे शाखा कक्ष-३ च्या पथकाने यशस्वी केली आहे.
