મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

Pune News : मुंढवा जमीन खरेदी प्रकरण: पार्थ पवारांच्या भूमिकेवर उच्च न्यायालयाचे ताशेरे

Pune News : पुण्यातील अत्यंत मोक्याच्या मुंढवा परिसरातील ४० एकर शासकीय जमीन अत्यंत सवलतीच्या दरात खरेदी केल्याच्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी (१ ऑक्टोबर) गंभीर दखल घेतली आहे.

વક
વિક્રાંત કુલકર્ણી

1 મિનિટ વાંચન

मुंढवा जमीन खरेदी प्रकरण: पार्थ पवारांच्या भूमिकेवर उच्च न्यायालयाचे ताशेरे पवार यांचा ‘अमेडिया’ कंपनीत ९९ टक्के हिस्सा; पुढील तपासावर महासंचालकांची नजर
मुंढवा जमीन खरेदी प्रकरण: पार्थ पवारांच्या भूमिकेवर उच्च न्यायालयाचे ताशेरे पवार यांचा ‘अमेडिया’ कंपनीत ९९ टक्के हिस्सा; पुढील तपासावर महासंचालकांची नजर

Pune News : पवार यांचा ‘अमेडिया’ कंपनीत ९९ टक्के हिस्सा; पुढील तपासावर महासंचालकांची नजर

Pune News : पुण्यातील अत्यंत मोक्याच्या मुंढवा परिसरातील ४० एकर शासकीय जमीन अत्यंत सवलतीच्या दरात खरेदी केल्याच्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी (१ ऑक्टोबर) गंभीर दखल घेतली आहे. खासदार आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांचा या व्यवहारातील ‘अमेडिया एंटरप्रायजेस एलएलपी’ या कंपनीत ९९ टक्के हिस्सा असतानाही तपासात त्यांना आरोपी का केले नाही, असा थेट सवाल न्यायालयाने विचारला आहे.https://maharashtramirror.com/ Pune News

न्यायाधीश माधव जामदार यांच्या एकल पीठासमोर या प्रकरणाची सुनावणी पार पडली. कंपनीत अवघा १ टक्का हिस्सा असलेल्या व्यक्तीला आरोपी बनवण्यात आले, परंतु ९९ टक्के मालकी हक्क आणि मुख्य लाभार्थी असलेल्या व्यक्तीवर (पार्थ पवार) तपास यंत्रणा आणि पोलीस मौन का बाळगून आहेत, असा सवाल न्यायालयाने उपस्थित केला.https://maharashtramirror.com/ Pune News

सदर सुनावणी ही पुण्यातील तहसीलदार सूर्यकांत येवले यांच्या पूर्वग्रहदूषित कारवाईविरोधातील अटकपूर्व जामीन अर्जादरम्यान झाली. आपल्यावर दबाव आणून या प्रकरणात गोवण्यात आले असून, मुख्य प्रभावशाली व्यक्तींना तपास यंत्रणेकडून संरक्षण दिले जात असल्याचा दावा येवले यांनी केला होता. न्यायालयाने येवले यांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

શેર કરો