મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

Mumbai-Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे आज एक तास बंद; वीजवाहिनीच्या कामामुळे वाहतूक थांबणार

• दुपारी 2 ते 3 या वेळेत वाहनांना प्रवेश नाही; प्रवाशांसाठी पर्यायी मार्ग जाहीर

વ
વિવેક

1 મિનિટ વાંચન

Mumbai-Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे आज एक तास बंद; वीजवाहिनीच्या कामामुळे वाहतूक थांबणार

•दुपारी 2 ते 3 या वेळेत वाहनांना प्रवेश नाही; प्रवाशांसाठी पर्यायी मार्ग जाहीर

मुंबई :- मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेने प्रवास करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची सूचना आहे. आज, मंगळवारी दुपारी 2 ते 3 या वेळेत एक्स्प्रेस वेवरील भातन गावाजवळ वाहतूक पूर्णपणे थांबवण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी (MSEDCL) येथे 22 केव्ही वीजवाहिनी टाकण्याचे काम करणार असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

वाहतूक बंदी आणि पर्यायी मार्ग

प्रवीण साळुंके, अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) यांनी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, या काळात मुंबई आणि पुणे दोन्ही लेनवरील वाहतूक पूर्णपणे थांबेल. वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पुण्याकडे जाण्यासाठी पर्यायी मार्ग

मुंबईकडून येणारी वाहने कळंबोली सर्कल (जेएनपीटी रोड) येथून राष्ट्रीय महामार्ग क्र. 48 वर वळवली जातील.

तसेच, शेड्रग एक्झिट (किमी 8.200) येथूनही महामार्ग क्र.48 वर वळवण्यात येतील आणि ही वाहने खालापूर टोलनाका (किमी 32.200) व मॅजिक पॉइंट (किमी 41.200) येथून पुन्हा द्रुतगती मार्गावर प्रवेश करू शकतील.

मुंबईकडे जाण्यासाठी पर्यायी मार्ग

पुण्याकडून येणारी वाहने खोपोली एक्झिट (किमी 39.100) वरून महामार्ग क्र. 48 वर वळवली जातील.

तसेच, खालापूर टोलनाका एक्झिट (किमी 32.600) वरून पाली ब्रीज मार्गे महामार्ग क्र. 48 वर वाहतूक सुरू राहील.

हे काम पूर्ण होताच वाहतूक पूर्ववत सुरू होईल. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

हेही वाचा: Mumbai Rain Update : मुंबईसह राज्यात पावसाचा जोर कायम; हवामान विभागाचा 'मेघगर्जनेसह पावसा'चा इशारा

શેર કરો