મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

Mumbai Police : मुंबई पोलिसांची मोठी कामगिरी! 4.26 कोटींचा मुद्देमाल नागरिकांना परत; 567 मोबाईल आणि 3 कोटींचे सोने मूळ मालकांच्या हाती

Mumbai Police Unit 4 : पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ-4 चा 'मुद्देमाल परतावा' सोहळा | 40 दिवसांच्या विशेष मोहिमेत 567 चोरीचे मोबाईल हस्तगत | घरफोडीच्या 24 गुन्ह्यांचाही छडा

વ
વિવેક

1 મિનિટ વાંચન

Mumbai Police : मुंबई पोलिसांची मोठी कामगिरी! 4.26 कोटींचा मुद्देमाल नागरिकांना परत; 567 मोबाईल आणि 3 कोटींचे सोने मूळ मालकांच्या हाती

Mumbai Police Unit 4 : पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ-4 चा 'मुद्देमाल परतावा' सोहळा | 40 दिवसांच्या विशेष मोहिमेत 567 चोरीचे मोबाईल हस्तगत | घरफोडीच्या 24 गुन्ह्यांचाही छडा

मुंबई :- मुंबईकरांसाठी आजचा दिवस आनंदाचा ठरला आहे. परिमंडळ-4 अंतर्गत येणाऱ्या विविध पोलीस ठाण्यांनी मागील 40 दिवसांत राबवलेल्या विशेष मोहिमेला मोठे यश आले असून, कोट्यवधी रुपयांचा मुद्देमाल तक्रारदारांना परत करण्यात आला आहे. यामध्ये वर्षानुवर्षे शोध सुरू असलेल्या मोबाईल फोन्सचा आणि मौल्यवान दागिन्यांचा समावेश आहे. Mumbai Police Unit 4 Latest News

તસવીરો · 1/4

Arrow Keys ⟵ ⟶

40 दिवसांची विशेष शोध मोहीम

20 जानेवारी 2026 पासून परिमंडळ-4 मध्ये चोरीला गेलेल्या आणि गहाळ झालेल्या मोबाईलचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली होती. यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्याचे स्वतंत्र पथक तयार करण्यात आले होते. या पथकांनी 2019 ते 2026 या सात वर्षांतील प्रलंबित तक्रारींची यादी तयार करून तांत्रिक पद्धतीने तपास सुरू केला.

हस्तगत केलेल्या मालाचा तपशील

आज झालेल्या कार्यक्रमात वितरीत करण्यात आलेल्या मुद्देमालाची आकडेवारी थक्क करणारी आहे:

मोबाईल फोन्स: मुंबई, महाराष्ट्र आणि इतर राज्यांत पथके पाठवून एकूण 567 मोबाईल हस्तगत करण्यात आले. ज्याची अंदाजे किंमत 1 कोटी 22 लाख 32 हजार 376 रुपये आहे.

सोन्याचे दागिने व इतर मालमत्ता: घरफोडी आणि चोरीच्या एकूण 24 गुन्ह्यांमधील सोन्याचे दागिने व इतर किमती वस्तू हस्तगत केल्या आहेत. याची किंमत 3 कोटी 4 लाख 2 हजार 654 रुपये इतकी आहे.

एकूण रक्कम: पोलिसांनी एकूण 4 कोटी 26 लाख 34हजार 27 रुपये किमतीचा मुद्देमाल मूळ मालकांना परत केला आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन आणि पथकाचे यश

पोलीस आयुक्त देवेन भारती, सह पोलीस आयुक्त सत्यनारायण आणि अपर पोलीस आयुक्त विक्रम देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप आयुक्त श्रीमती रागसुथा आर. यांनी या संपूर्ण मोहिमेचे नियोजन केले. यामध्ये भोईवाडा, माटुंगा, सायन या विभागांचे सहाय्यक आयुक्त तसेच भोईवाडा, काळाचौकी, माटुंगा, र.अ. किडवाई मार्ग, सायन, ॲन्टॉप हिल आणि वडाळा टी.टी. पोलीस ठाण्यांच्या वरिष्ठ निरीक्षकांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

શેર કરો