મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

Mumbai Crime : चोरीच्या आयफोनचे पार्ट्स करून विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

Mumbai Crime : मुंबई, महाराष्ट्र मिरर : विविध राज्यांतून चोरी केलेले अॅपल आयफोन खरेदी करून त्यातील अॅपल आयडी निष्क्रिय करत ते देशात तसेच परदेशात विक्री करणाऱ्या टोळीचा मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.

વક
વિક્રાંત કુલકર્ણી

2 મિનિટ વાંચન

चोरीच्या आयफोनचे पार्ट्स करून विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश चौघांना अटक; ४४.७८ लाखांचा मुद्देमाल जप्त
चोरीच्या आयफोनचे पार्ट्स करून विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश चौघांना अटक; ४४.७८ लाखांचा मुद्देमाल जप्त

Mumbai Crime : चौघांना अटक; ४४.७८ लाखांचा मुद्देमाल जप्त

Mumbai Crime : मुंबई, महाराष्ट्र मिरर : विविध राज्यांतून चोरी केलेले अॅपल आयफोन खरेदी करून त्यातील अॅपल आयडी निष्क्रिय करत ते देशात तसेच परदेशात विक्री करणाऱ्या टोळीचा मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी चौघांना अटक करून सुमारे ४४ लाख ७८ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.https://maharashtramirror.com/ mumbai Crime

मुंबईतील पोलीस ठाण्यात २०२६ मध्ये अॅपल मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याचा तांत्रिक तपास करताना चोरीच्या मोबाईलमध्ये एका सिमकार्डचा वापर झाल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानंतर संबंधित सिमकार्डच्या आधारे तांत्रिक तपास करून पोलिसांनी एका संशयिताचा शोध घेतला. त्याच्याकडे केलेल्या तपासात पोलिसांना २१ चोरीचे अॅपल मोबाईल आणि १२ सिमकार्ड मिळून आले. या धाग्यावरून तपासाची व्याप्ती वाढविल्यानंतर चोरीच्या आयफोनची खरेदी-विक्री करणाऱ्या मोठ्या साखळीचा उलगडा झाला.https://maharashtramirror.com/ mumbai Crime

अँपल आयडी निष्क्रिय करून आयफोनची पुनर्विक्री

पोलिसांच्या तपासानुसार, टोळीतील आरोपी महाराष्ट्रासह विविध राज्यांतून चोरी झालेले अॅपल मोबाईल खरेदी करत होते. त्यानंतर त्यातील अॅपल आयडी निष्क्रिय करून मोबाईल पुन्हा देशात किंवा परदेशात विकले जात होते. अॅपल आयडी निष्क्रिय न झाल्यास मोबाईलचे डिस्प्ले, बॅटरी, मदरबोर्ड, लॉजिक बोर्ड आणि इतर पार्ट्स वेगळे करून बाजारात कमी किमतीत विकले जात असल्याचे तपासात समोर आले.https://maharashtramirror.com/ mumbai Crime

तांत्रिक तपासातून टोळीपर्यंत पोलीस पोहोचले

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त मनिष वालवालिया आणि सहाय्यक पोलीस आयुक्त निलेश बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमिल मुळे आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) पारिद खान यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कामगिरी केली.https://maharashtramirror.com/ mumbai crime

एका चोरीच्या मोबाईलमध्ये वापरण्यात आलेल्या सिमकार्डपासून सुरू झालेला तपास थेट विविध राज्यांतील चोरीचे महागडे आयफोन खरेदी करून त्यांची पुनर्विक्री किंवा पार्ट्सची विक्री करणाऱ्या टोळीपर्यंत पोहोचल्याने या प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याचे स्पष्ट झाले आहे.
अनेक गुन्ह्यांचा झाला उलगडा https://maharashtramirror.com/ mumbai crime
या कारवाईत टोळीतील चार आरोपींना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून अॅपल मोबाईल तसेच सुमारे २० चोरीच्या मोबाईलचे वेगवेगळे केलेले मिडल बॉडी, डिस्प्ले, बॅटरी, मदरबोर्ड आणि लॉजिक बोर्ड असा एकूण ४४ लाख ७८ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.https://maharashtramirror.com/ Mumbai crime

जप्त केलेल्या चोरीच्या मोबाईलच्या तपासातून देशातील अनेक राज्यांमध्ये दाखल गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे. त्यामध्ये तेलंगणा येथील ११, दिल्लीतील ३, महाराष्ट्रातील मुंबई येथील १९, कर्नाटकातील २, राजस्थान, तमिळनाडू आणि उत्तराखंडमधील प्रत्येकी एका प्रकरणाचा समावेश असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

શેર કરો