મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

Mumbai Malad Crime Branch : गोळीबार करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणारा आरोपी नवी दिल्लीतून जेरबंद! मुंबई गुन्हे शाखेची मालाड प्रकरणातील यशस्वी कामगिरी

Mumbai Malad Crime Branch : अग्निशस्त्रासह दोन जिवंत काडतुसे जप्त; कुरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असलेल्या आरोपीला बेड्या

વ
વિવેક

1 મિનિટ વાંચન

Mumbai Malad Crime Branch : गोळीबार करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणारा आरोपी नवी दिल्लीतून जेरबंद! मुंबई गुन्हे शाखेची मालाड प्रकरणातील यशस्वी कामगिरी

Mumbai Malad Crime Branch : अग्निशस्त्रासह दोन जिवंत काडतुसे जप्त; कुरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असलेल्या आरोपीला बेड्या

मुंबई :- मालाड (पूर्व) येथे बंदुकीतून (अग्निशस्त्रा) गोळीबार करून एका नागरिकाला जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला मुंबई गुन्हे शाखेच्या कक्ष-12 Mumbai Crime Branch Malad (दहिसर) च्या पथकाने नवी दिल्लीतून शिताफीने अटक केली आहे. या यशस्वी कारवाईमुळे गोळीबारानंतर परराज्यात पसार झालेल्या आरोपीला तातडीने पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. Mumbai Latest Crime News

काय आहे प्रकरण?

28 सप्टेंबर 2025 रोजी पहाटेच्या दरम्यान मालाड पूर्व येथील रामजी कंपाऊंड, तबेला, संजय नगर परिसरात ही घटना घडली होती. आरोपी निहाज उर्फ गुड्डू शेख याने फिर्यादी अबु तल्हा अव्वल बेग (वय 58) यांच्यावर अग्निशस्त्रातून गोळी झाडून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून कुरार पोलीस ठाणे, मुंबई येथे गुन्हा भारतीय न्याय संहिता (BNS) आणि महाराष्ट्र पोलीस कायदा (MPKA) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हे शाखेची कामगिरी

कुरार पोलीस ठाण्यात Kurar Police Station गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे शाखेच्या कक्ष-12 च्या पथकाने या गुन्ह्याचा समांतर तपास सुरू केला. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा कसून शोध घेतला.गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या खात्रीलायक माहितीवरून त्यांनी नवी दिल्लीत सापळा रचला आणि आरोपी निहाज उर्फ गुड्डू शेख याला अटक केली.

जप्त मुद्देमाल

पोलिसांनी आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेले अग्निशस्त्र आणि दोन जिवंत काडतुसे हस्तगत केली आहेत.

Indian Police Service (IPS) officer Deven Bharti is appointed as the new commissioner of Mumbai police

अटक करण्यात आलेल्या आरोपीला पुढील कायदेशीर कारवाईसाठी कुरार पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास कुरार पोलीस करत आहेत.पोलीस आयुक्त देवेन भारती आणि सह आयुक्त (गुन्हे) लखमी गौतम यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, कक्ष-12 च्या पथकाने ही कामगिरी यशस्वीरित्या पार पाडली.

શેર કરો