Mumbai News : अन्न व औषध प्रशासनाचा मुंबईत मोठा दणका; नियम धाब्यावर बसवणाऱ्या 8 हॉटेल्स अन् आस्थापनांवर कडक कारवाई!'
Mumbai News :मुंबई :- अन्नपदार्थांची सुरक्षित हाताळणी, निकृष्ट दर्जाची स्वच्छता आणि साठवणुकीच्या नियमांचे उघडपणे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मुंबई विभागात मोठी धडक मोहीम उघडली आहे.
2 મિનિટ વાંચન

Mumbai News : 3 आस्थापनांचे परवाने कायमचे रद्द, तर 5 जणांचे परवाने निलंबित; ब्लिंकिट, कॅफे सुलतान, कंट्री क्लबचा समावेश'

Mumbai News :मुंबई :- अन्नपदार्थांची सुरक्षित हाताळणी, निकृष्ट दर्जाची स्वच्छता आणि साठवणुकीच्या नियमांचे उघडपणे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मुंबई विभागात मोठी धडक मोहीम उघडली आहे. एफडीएच्या विशेष पथकाने केलेल्या अचानक तपासणीत अन्न सुरक्षेचे नियम पायदळी तुडवणाऱ्या एकूण 8 प्रमुख आस्थापनांवर कडक कारवाई करण्यात आली आहे. यापैकी ५ आस्थापनांचे अन्न परवाने (Food License) थेट निलंबित करण्यात आले आहेत, तर 3 आस्थापनांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत.https://maharashtramirror.com/ Mumbai News
तपासणीदरम्यान या सर्व ठिकाणी किचनमधील घाण, आरोग्यविषयक गंभीर त्रुटी, अन्नपदार्थांची असुरक्षित हाताळणी व साठवणूक, तसेच अन्न दूषित (Contamination) होऊ नये यासाठी आवश्यक असलेल्या प्रतिबंधात्मक उपायांचा पूर्णपणे अभाव आढळून आला होता.https://maharashtramirror.com/ Mumbai News
'या 5 नामांकित आस्थापनांचे अन्न परवाने निलंबित'
एफडीएने दिलेल्या माहितीनुसार, खालील 5 ठिकाणी स्वच्छता आणि सुरक्षेच्या मानकांचे घोर उल्लंघन झाल्याने त्यांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत:
कॅफे सुलतान (सांताक्रुझ पूर्व): अन्नपदार्थांची अत्यंत अस्वच्छ पद्धतीने हाताळणी आणि किचन व परिसराच्या स्वच्छतेबाबत गंभीर त्रुटी आढळल्याने कारवाई.
लो फ्रेश फूड प्रा. लिमिटेड (मरोळ, अंधेरी पूर्व): अन्नाची साठवणूक करणाऱ्या गोदामात व साठवणुकीच्या ठिकाणी आरोग्यविषयक नियमांचे पालन न केल्यामुळे परवाना निलंबित.
कंट्री क्लब (अंधेरी पश्चिम): अन्न दूषित होण्यापासून रोखणाऱ्या यंत्रणेचा अभाव, अस्वच्छ परिसर आणि साठवणुकीत त्रुटी आढळल्याने दणका.
सूरज लामा मोमोस (अंधेरी पश्चिम): मोमोस तयार करताना, हाताळताना आणि साठवताना स्वच्छतेचे किमान निकषही न पाळल्याचे निदर्शनास आले.
कॅफे पाकिझा (सांताक्रुझ पश्चिम): वारंवार सूचना देऊनही अन्नपदार्थांची सुरक्षितता व स्वच्छतेबाबत आवश्यक सुधारणा न केल्यामुळे कारवाई.
'विलेपार्लेतील ब्लिंकिटसह 3 आस्थापनांचे परवाने थेट रद्द!'
अन्न सुरक्षेच्या नियमांचे वारंवार उल्लंघन करणाऱ्या आणि परवान्याच्या अटींना हरताळ फासणाऱ्या 3 बड्या आस्थापनांचे परवाने एफडीएने कायमचे रद्द केले आहेत:
ब्लिंकिट (एस. व्ही. रोड, विलेपार्ले): ऑनलाईन डिलिव्हरी करणाऱ्या या डार्क स्टोअरमध्ये अन्न व्यवसायाशी संबंधित परवाना अटी आणि अन्न सुरक्षेच्या अत्यंत महत्त्वाच्या तरतुदींचे पालन होत नसल्याचे स्पष्ट झाल्याने परवाना रद्द करण्यात आला.
कोपेनहेगन हॉस्पिटॅलिटी (विलेपार्ले): अन्नपदार्थ दूषित होण्यापासून रोखण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रतिबंधात्मक उपायांचा अभाव आढळल्याने कारवाई.
इटक्लब (वांद्रे पश्चिम): किचनची दयनीय अवस्था आणि सुरक्षित हाताळणीच्या अटींचे समाधानकारक पालन न झाल्यामुळे परवाना रद्द करण्यात आला.
नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या कोणत्याही हॉटेल किंवा अन्न व्यवसायिकांची गय केली जाणार नाही; नियम मोडणाऱ्यांवर यापुढेही अशीच कठोर कारवाई सुरूच राहील, असा सज्जड इशारा अन्न व औषध प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
