Mumbai Digital Fraud : फसवणुकीचं 'डिजिटल साम्राज्य' उद्ध्वस्त! ईडीकडून ऑनलाइन ट्रेडिंग घोटाळ्यावर धाडसी कारवाई
Mumbai Latest Digital Fraud News : मुंबईसह चार शहरांमध्ये ईडीची एकाच वेळी कारवाई; कागदपत्रं, हार्डडिस्क आणि डिजिटल पुरावे जप्त
1 મિનિટ વાંચન

Mumbai Latest Digital Fraud News : मुंबईसह चार शहरांमध्ये ईडीची एकाच वेळी कारवाई; कागदपत्रं, हार्डडिस्क आणि डिजिटल पुरावे जप्त
मुंबई | देशातील गुंतवणूकदारांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या ऑनलाइन फॉरेक्स ट्रेडिंग घोटाळ्याचा पर्दाफाश झाला असून, अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) मुंबई युनिटने मोठ्या प्रमाणावर धाडसत्र राबवत या प्रकरणात कारवाईचा धडका दिला आहे. Mumbai Latest Crime News
OctaFX या ट्रेडिंग अॅपच्या माध्यमातून देशभरातील सामान्य गुंतवणूकदारांना उच्च नफ्याचं आमिष दाखवत कोट्यवधींची फसवणूक करण्यात आली होती. याच पार्श्वभूमीवर ईडीने मुंबई, दिल्ली, चेन्नई आणि गुरुग्राम येथे एकाचवेळी छापे टाकले. सात ठिकाणी पार पडलेल्या या कारवाईत अनेक संगणकीय उपकरणं, हार्डडिस्क, मोबाईल्स आणि वित्तीय व्यवहारांची महत्त्वाची कागदपत्रं जप्त करण्यात आली.
हेही वाचा: Chhatrapati Sambhajinagar Bribe News : "नोंदणीसाठी लाच" – सिडको कर्मचाऱ्याला रंगेहात पकडले!
OctaFX अॅप आणि त्याच्या संकेतस्थळावर आंतरराष्ट्रीय दलालांच्या माध्यमातून भारतीय गुंतवणूकदारांना आकर्षित केलं जात होतं. त्यांना फॉरेक्स मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या संधीचं आमिष दाखवत, रिझर्व्ह बँकेच्या परवानगीशिवाय व्यवहार केले जात होते.
तपासात उघड झालं की, OctaFX आणि एमएस ऑक्टाएफएक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या संस्थांनी मिळून अवघ्या काही महिन्यांत 800 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम गोळा केली. ही रक्कम परदेशी खात्यांमध्ये वळवली गेल्याचा संशय ईडीने व्यक्त केला आहे.
हेही वाचा: Thane Crime News : प्रतिबंधित ‘खैर’ लाकूड वाहतूक करणारा ट्रक चालक अटकेत!
या फसवणुकीचा थरारक तपास सुरू झाला तो पुण्यातील शिवाजी नगर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यापासून. या एफआयआरच्या आधारे ईडीने आर्थिक अनियमिततेची साखळी उकलायला सुरुवात केली.
तपास अधिक गडद होत असताना, ईडीने आतापर्यंत 160 कोटी रुपयांची मालमत्ता गोठवली असून, आणखी मालमत्ता शोधण्यात येत आहेत. गुंतवणूकदारांची फसवणूक आणि विदेशी विनिमय कायद्याचं उल्लंघन यावर कारवाईचा भर दिला जात आहे.
हेही वाचा: Thane Rape News : शर्मिला अध:पतनाचा अंत… न्यायाच्या दरबारात विकृतीचा पराभव!
