મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

Mumbai News : ज्येष्ठ नागरिकांना टार्गेट करणाऱ्या बनावट APK ॲप्स रॅकेटचा पर्दाफाश; मुंबई गुन्हे शाखेकडून मध्यप्रदेशातून सॉफ्टवेअर डेव्हलपरला बेड्या!'

Mumbai News : मुंबई : - बनावट APK फाईल्सद्वारे ज्येष्ठ नागरिक व इतर नागरिकांना जाळ्यात ओढून त्यांची लाखो रुपयांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या एका मोठ्या आंतरराज्यीय सायबर गुन्हेगारी रॅकेटचा मुंबई पोलीस गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाने यशस्वीरीत्या पर्दाफाश केला आहे.

વક
વિક્રાંત કુલકર્ણી

1 મિનિટ વાંચન

ज्येष्ठ नागरिकांना टार्गेट करणाऱ्या बनावट APK ॲप्स रॅकेटचा पर्दाफाश; मुंबई गुन्हे शाखेकडून मध्यप्रदेशातून सॉफ्टवेअर डेव्हलपरला बेड्या!'
ज्येष्ठ नागरिकांना टार्गेट करणाऱ्या बनावट APK ॲप्स रॅकेटचा पर्दाफाश; मुंबई गुन्हे शाखेकडून मध्यप्रदेशातून सॉफ्टवेअर डेव्हलपरला बेड्या!'

Mumbai News :'देशभरात 9676 नागरिकांची तब्बल 15 कोटी 75 लाखांची फसवणूक; 2805 'मॅलिशिअस' ॲप्स बनवून भामट्याने सायबर गुन्हेगारांना विकल्याचे उघड

Mumbai News : मुंबई :- बनावट APK फाईल्सद्वारे ज्येष्ठ नागरिक व इतर नागरिकांना जाळ्यात ओढून त्यांची लाखो रुपयांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या एका मोठ्या आंतरराज्यीय सायबर गुन्हेगारी रॅकेटचा मुंबई पोलीस गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाने यशस्वीरीत्या पर्दाफाश केला आहे. मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने थेट मध्यप्रदेशात छापा टाकून बनावट APK फाईल्स तयार करणाऱ्या 36 वर्षीय मुख्य आरोपी सॉफ्टवेअर डेव्हलपरला गजाआड केले आहे.https://maharashtramirror.com/ Mumbai News

या भामट्याने तब्बल 2805 धोकादायक (Malicious) APK फाईल्स बनवून देशभरातील इतर सायबर गुन्हेगारांच्या टोळ्यांना विकल्याचे तपासात समोर आले आहे. या फाईल्सच्या माध्यमातून देशभरात 9,673लोकांची सुमारे 15 कोटी 75 लाख रुपये इतकी अवाढव्य फसवणूक करण्यात आली आहे.https://maharashtramirror.com/ Mumbai news

'सीनिअर सिटीझन कार्ड'च्या नावाखाली 5.62 लाखांचा गंडा

असा उघड झाला प्रकार 13 ऑगस्ट 2026 रोजी एका 73 वर्षीय ज्येष्ठ नागरिकास अज्ञाताने फोन करून 'बँक ऑफ इंडिया'चा सिनिअर मॅनेजर दिनेश कुमार बोलत असल्याचे भासवले. 'सीनिअर सिटीझन कार्ड' बनवून देण्याच्या बहाण्याने विश्वास संपादन करून त्यांच्या व्हॉट्सॲपवर Senior Citizen Card Verification.apk नावाची बनावट फाईल पाठवली. ही फाईल डाऊनलोड करून बँक तपशील भरताच तक्रारदाराच्या खात्यातून 5.62 लाख रुपये परस्पर लांबवण्यात आले. याप्रकरणी भायखळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाने समांतर तपास सुरू केला.

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली धडाकेबाज कामगिरी

ही कारवाई पोलीस आयुक्त देवेन भारती, पोलीस सह आयुक्त (गुन्हे) अनिल कुंभारे, अपर पोलीस आयुक्त कृष्ण कान्त उपाध्याय आणि पोलीस उप आयुक्त (प्रकटीकरण) राज तिलक रौशन यांच्या थेट मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईत सहाय्यक पोलीस आयुक्त सदानंद राणे, प्रभारी पोलीस निरीक्षक मंगेश देसाई, पोलीस निरीक्षक दादा गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन जाधव, प्रकाश गवळी, तसेच अंमलदार अमित करपाते, विश्वनाथ पोळ, योगेश गाढवे, निधी नाईक आणि पश्चिम सायबर मयुर थोरात यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

શેર કરો