Mumbai Crime News : मुंबईत पायधुनी पोलिसांची धडक कारवाई; परदेशी बनावटीच्या सिगारेट्सचा अवैध साठा जप्त करत 19 जणांना अटक
•हॉटेल स्टार्सवर पोलिसांचा छापा; 72 लाख 21 हजार 710 रुपयांचा लाखांचा मुद्देमाल हस्तगत,मशीद बंदर परिसरातून परदेशी सिगारेट्सचा अवैध साठा जप्त; 19 जणांवर गुन्हे दाखल
2 મિનિટ વાંચન

•हॉटेल स्टार्सवर पोलिसांचा छापा; 72 लाख 21 हजार 710 रुपयांचा लाखांचा मुद्देमाल हस्तगत,मशीद बंदर परिसरातून परदेशी सिगारेट्सचा अवैध साठा जप्त; 19 जणांवर गुन्हे दाखल
मुंबई :- मुंबईतील पायधुनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक मोठी कारवाई समोर आली आहे. परदेशी बनावटीच्या सिगारेट्स व इलेक्ट्रॉनिक सिगारेट्सचा बेकायदेशीररीत्या अवैध साठा करून विरणी व विक्रीकरिता जवळ बाळगणाऱ्या आरोपींविरुद्ध पोलिसांनी धडक कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. दिनांक 28 ऑक्टोबर 2026 रोजी पायधुनी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने हॉटेल स्टार्स, मशीद बंदर पश्चिम, मुंबई-3 या ठिकाणी अचानक छापा टाकला.
या कारवाईदरम्यान परदेशी बनावटीच्या सिगारेट्स आणि इलेक्ट्रॉनिक सिगारेट्सचा अवैध साठा विक्रीकरिता जवळ बाळगणाऱ्या एकूण 19 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आणि त्यांच्यावर तात्काळ कायदेशीर कारवाई केली. या कारवाईमध्ये पोलिसांनी परदेशी बनावटीच्या तब्बल 11710 नग सिगारेट्स आणि 2172 नग इलेक्ट्रॉनिक सिगारेट्स असा एकूण 72 लाख 21 हजार 710 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
कारवाईत पकडण्यात आलेल्या 19 आरोपींची नावे व तपशील
पायधुनी पोलिसांनी केलेल्या या धडक कारवाईत ताब्यात घेण्यात आलेल्या 19 आरोपींची नावे खालीलप्रमाणे आहेत.
मुजीब हाशिम बकेल अहमद (वय 31)
मोहम्मद मिस्बाह मुनीर कुल्लई (वय 25)
मोहम्मद अल्ताफास हसीनूर (वय 20)
अशफ अब्दुल्ला कोटकूल्लम (वय 46)
अब्दुल रौफ मोहम्मद (वय 40)
अब्दुल अजमल रोशन (वय 31)
अब्दुल तमीम मोहम्मद हनीफा (वय 24)
मोहीद्दिन नाजी अब्दुल नाजर (वय 25)
रफिक इब्राहीम खिबूर (वय 38)
अबुबक्कर सोहेल मोहम्मद (वय 26)
मोहम्मद शाकीर अब्दुल कादर (वय 32)
अबू ताहेर इब्राहीम अर्शद मंजिल (वय 32)
अराफत तोटी हमजा (वय 41)
सुबेरअली मोहम्मद तोटी (वय 48)
मोहीद्दिन कुल्मी शाफी (वय 30)
मोहम्मद रफिक युसेवर उमर (वय 41)
मोहीद्दिन सुबेर (वय 41)
अब्दुल रहेमान कुल्ल्यली तुपकल (वय 42)
अब्दुल बाशित के.ओ. (वय 33)
पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलिस आयुक्त मनोजकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त राजसुधा आर. आणि साहाय्यक पोलीस आयुक्त रेणुका बुवा यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक लक्ष्मीकांत साळुंखे व त्यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली आहे.
हेही वाचा: विरारच्या ग्लोबल सिटी परिसरात थरारक घटना; बंद फ्लॅटमध्ये तीन भाऊ-बहिणींचे मृतदेह आढळल्याने एकच खळबळ
