મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

Mumbai Crime News : बिस्किटात लपवलेले विष! दोहाहून मुंबईत आली आणि कोट्यवधींचं कोकेन पकडलं

•मुंबई विमानतळावर DRI ची धडक कारवाई; महिला प्रवाशाकडून 62 कोटींचं कोकेन जप्त

વ
વિવેક

1 મિનિટ વાંચન

Mumbai Crime News

•मुंबई विमानतळावर DRI ची धडक कारवाई; महिला प्रवाशाकडून 62 कोटींचं कोकेन जप्त

मुंबई | चॉकलेट आणि बिस्किटांच्या पुड्यांमध्ये लपवून कोकेनची तस्करी करणाऱ्या एका परदेशी महिला प्रवाशाला महसूल गुप्तवार्ता संचालनालयाच्या (DRI) अधिकाऱ्यांनी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर रंगेहात अटक केली. तिच्याकडून 6,261 ग्रॅम कोकेन हस्तगत करण्यात आले असून, त्याची आंतरराष्ट्रीय बाजारमूल्याची किंमत तब्बल 62 कोटी 60 लाख रुपये आहे.

कतारच्या दोहा येथून सोमवारी मुंबईत दाखल झालेल्या एका महिलेकडून कोकेनची तस्करी केली जात असल्याची गोपनीय माहिती DRI अधिकाऱ्यांना मिळाली होती. या माहितीनुसार, DRI महिला अधिकाऱ्यांनी विमानतळावर सापळा रचून संशयित महिलेची झडती घेतली. तिच्याकडे 6 ओरेओ बिस्किटांचे आणि 3 चॉकलेटचे पुडे आढळले.

प्रारंभी तिने काहीही नाकारले. मात्र बॅगेतील बिस्किट व चॉकलेटच्या पाकिटांमध्ये काहीतरी लपवले असल्याचा संशय अधिकाऱ्यांना आला. त्यात 300 कॅप्सूल्स आढळले, ज्यामध्ये पांढऱ्या रंगाची भुकटी भरलेली होती. DRI च्या प्राथमिक चाचणी किटमधून ही भुकटी कोकेन असल्याचे स्पष्ट झाले.

या महिलेविरुद्ध अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. तपास यंत्रणांना हा केवळ एक "कुरियर" असण्याचा दाट संशय असून, या प्रकरणामागे आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ तस्करांच्या टोळीचा हात असल्याचे DRI अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

DRI च्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, कोकेनसाठी मुंबई हे देशातील सर्वात मोठं वितरण केंद्र मानलं जातं. दिल्ली आणि मुंबईत कोकेनची सर्वाधिक मागणी असून, उच्चभ्रू वर्तुळातील तरुण, कॉर्पोरेट कर्मचारी, व्यावसायिक आणि चित्रपटसृष्टीतील काही मंडळी याचे मुख्य ग्राहक असल्याचे स्पष्ट झाले आहे.

दक्षिण अमेरिका आणि आफ्रिकेतील गरिब देशांतील नागरिकांना या तस्करीसाठी हाताशी धरलं जातं. विशेषतः बोलिव्हिया, व्हेनेझुएला, गयाना, ब्राझील, कोलंबिया आणि सुरीनाम येथून अमली पदार्थ भारतात आणले जातात. त्यासाठी अदीस अबाबा–दुबई–मुंबई किंवा साओ पावलो–दुबई–मुंबई हे मार्ग कुख्यात बनले आहेत.

हेही वाचा: Anil Parab : "मंत्र्यांचे व्हिडीओ व्हायरल… मग जनसुरक्षा कुठे?"

શેર કરો