Mumbai Crime News : कांदिवलीत 17 वर्षांच्या तरुणीवर घातक दगडाने हल्ला; भीषण मारहाण करणारा आरोपी अजूनही फरार
Mumbai Latest Crime News : रस्त्यावर शिवीगाळ करत आरोपीने केली वीटने वारं; तरुणी गंभीर जखमी, तिच्यावर उपचार सुरु,पोक्सो आणि विविध कलमांतर्गत गुन्हा नोंद
1 મિનિટ વાંચન

Mumbai Latest Crime News : रस्त्यावर शिवीगाळ करत आरोपीने केली वीटने वारं; तरुणी गंभीर जखमी, तिच्यावर उपचार सुरु,पोक्सो आणि विविध कलमांतर्गत गुन्हा नोंद
मुंबई (कांदिवली पश्चिम) :- शनिवारी दुपारी कांदिवलीच्या गोसालिया रस्त्यावर 17 वर्षांच्या तरुणीवर घातक हल्ला झाला, ज्यामुळे ती गंभीर जखमी झाली आहे. Mumbai Kandivali Latest Crime News आरोपी राहुल सिंग (19 वय) या तरुणाने तिचा पाठलाग करत शिवीगाळ केली आणि रस्त्यावर पडलेली वीट उचलून त्याने त्याने तिच्या डोक्यावर जबरदस्त वार केला. या हल्ल्यामुळे तरुणीचा मोबाईल फोनही फोडला गेला.
पीडित तरुणी कांदिवली पश्चिमेतील रहिवासी असून सध्या शताब्दी रुग्णालयात तिच्यावर तातडीने उपचार सुरू आहेत. तिला गंभीर जखमा आल्यामुळे तज्ञांचे सतत निरीक्षण आहे.
कांदिवली पोलिसांनी Kandivali Police या गंभीर घटनेवर पोलिस अधिनियमांच्या कलम 78,118 (1), 115 (2), 352, 324 (4) आणि पोक्सो कायद्यानुसार गुन्हा नोंदविला असून आरोपी फरार आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवी अडाणे यांनी म्हटले, “आम्ही आरोपीला पकडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. नागरिकांनी सावधगिरी बाळगावी आणि कोणत्याही संशयास्पद हालचालींची माहिती त्वरित पोलीस ठाण्याला द्यावी.”
या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, स्थानिकांनी पोलिसांकडून तातडीने योग्य कारवाई करण्याची मागणी केली आहे.
