Mumbai ACB Trap News : खाकीला लाचेचा कलंक! चौकशी अहवाल बाजूने देण्यासाठी 3 लाखांची मागणी करणारा सहाय्यक पोलीस निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात
Mumbai Khar ACB Latest Bribe Case : खार पोलीस ठाण्यातील कारवाई; दीड लाखांची लाच स्वीकारताना सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार काळे रंगेहाथ अटक
1 મિનિટ વાંચન

Mumbai Khar ACB Latest Bribe Case : खार पोलीस ठाण्यातील कारवाई; दीड लाखांची लाच स्वीकारताना सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार काळे रंगेहाथ अटक
मुंबई :- मुंबईतील खार पोलीस ठाण्यात Mumbai Khar Police कार्यरत असलेल्या एका सहाय्यक पोलीस निरीक्षकाला (API) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) दीड लाख रुपयांची लाच स्वीकारताना अटक केली आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार सुरू असलेल्या एका चौकशीचा अहवाल तक्रारदाराच्या भावाच्या बाजूने देण्यासाठी या पोलीस अधिकाऱ्याने लाचेची मागणी केली होती. Mumbai Latest Crime News
प्रकरण काय आहे?
तक्रारदार यांच्या भावाने मालमत्तेच्या वादा संदर्भात वांद्रे येथील अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयात फौजदारी खटला दाखल केला होता. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश न्यायालयाने खार पोलीस ठाण्याला दिले होते. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार तात्यासाहेब काळे (वय 40) यांच्याकडे सोपवण्यात आला होता.
3 लाखांची मागणी, दीड लाखात तडजोड
तपासादरम्यान सपोनि तुषार काळे यांनी तक्रारदाराच्या भावाचा जबाब नोंदवून घेतला आणि 'आमच्याकडे तेवढे बघा' असा सूचक इशारा दिला. जेव्हा तक्रारदाराने काळे यांची भेट घेतली, तेव्हा त्यांच्या भावाच्या बाजूने चौकशी अहवाल सादर करण्याच्या मोबदल्यात काळे यांनी 3 लाख रुपयांची मागणी केली. तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी 19 जानेवारी 2026 रोजी एसीबीच्या वरळी कार्यालयात धाव घेऊन तक्रार नोंदवली. Mumbai Latest Police News
एसीबीचा सापळा आणि अटक
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 13 मार्च 2026 रोजी या तक्रारीची पडताळणी केली. तपासाअंती काळे यांनी 3 लाखांवरून तडजोड करत 1.50 लाख रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. त्यानुसार, 16 मार्च 2026 रोजी खार परिसरात सापळा रचण्यात आला. तक्रारदाराकडून लाचेची रक्कम 1.50 लाख रुपये स्वीकारत असतानाच एसीबीच्या पथकाने तुषार काळे यांना रंगेहाथ पकडले. Mumbai Latest Bribe Case
कायदेशीर कारवाई
आरोपी तुषार काळे यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 च्या कलम 7 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई अपर पोलीस आयुक्त संदीप दिवाण, पोलीस उप आयुक्त अनिल घाडगीकर आणि राजेंद्र सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दीपिका डंगारणे व त्यांच्या पथकाने केली.
