મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

Mumbai news : मुंबईत २२ किलोहून अधिक गांजासह तस्कराला अटक

Mumbai news :मुंबई: मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या आणि तस्करांचे जाळे उद्ध्वस्त करण्यासाठी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे.

વક
વિક્રાંત કુલકર્ણી

2 મિનિટ વાંચન

टिळकनगर पोलीस ठाण्यात
टिळकनगर पोलीस ठाण्यात

Mumbai news : जप्त केलेल्या मालाची किंमत ११ लाख; ओरिसा कनेक्शन उघड

Mumbai news :मुंबई: मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या आणि तस्करांचे जाळे उद्ध्वस्त करण्यासाठी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. अंमली पदार्थ विरोधी कक्षाच्या घाटकोपर युनिटच्या पथकाने गस्तीदरम्यान एका इसमाला ताब्यात घेऊन त्याच्याकडून तब्बल ११ लाख ४८ हजार रुपये किमतीचा २२ किलो ९६० ग्रॅम वजनाचा ‘गांजा’ हा अंमली पदार्थ जप्त केला आहे. या प्रकरणी टिळकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली आहे.https://maharashtramirror.com/ mumbai news

पोलिसांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार, दिनांक १३ ऑक्टोबर २०२६ रोजी अंमली पदार्थ विरोधी कक्ष, घाटकोपर युनिटचे पथक सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड ब्रिजजवळ, लोकमान्य टिळक टर्मिनस रेल्वे स्थानकाबाहेरील गार्डनजवळ, टिळकनगर, चेंबूर (पश्चिम), मुंबई या परिसरात गस्त घालत होते. त्या दरम्यान एक इसम संशयित हालचाली करताना व बेकायदेशीर अंमली पदार्थ जवळ बाळगून विक्री करण्याच्या तयारीत असल्याच पोलिसांच्या लक्षात आले. पोलिसांनी तातडीने कारवाई करत त्या इसमाला ताब्यात घेतले.

ताब्यात घेतलेल्या व्यक्तीची पंचांसमक्ष झडती घेतली असता, त्याच्याकडे एकूण २२ किलो ९६० ग्रॅम वजनाचा गांजा हा अंमली पदार्थ आढळून आला. या प्रकरणी अंमली पदार्थ विरोधी कक्ष (टिळकनगर पोलीस ठाणे) नुसार एन.डी.पी.एस. कायदा १९८५ च्या कलमांतर्गत गुन्हा नोंदवून आरोपीला तात्काळ अटक करण्यात आली.

मनिषकुमार बैजनाथ चौधरी (२५) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. अटक केलेल्या आरोपीकडे कसून चौकशी केली असता, त्याने हा गांजाचा साठा ओरिसा राज्यातून आणला असून तो मुंबईमध्ये विक्री करण्यासाठी आणल्याची कबुली दिली आहे. आरोपीकडून जप्त करण्यात आलेल्या २२ किलो ९६० ग्रॅम गांजाची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत ११,४८,००० रुपये असल्याचे स्पष्ट झाले आहे.

सदरची ही यशस्वी कारवाई पोलीस आयुक्त देवेन भारती, पोलीस सह आयुक्त (गुन्हे) अनिल कुंभारे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) कृष्णकांत उपाध्याय, पोलीस उप आयुक्त पोर्णिमा चौगुले-श्रींगी आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सुधीर हिरडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या कारवाईमध्ये घाटकोपर युनिटचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकांत आदाटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वाघ, पोलीस उपनिरीक्षक पंकज पाटील आणि इतर अंमलदारांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. मुंबई पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे अमली पदार्थ तस्करांचे धाबे दणाणले आहेत.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

શેર કરો