મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

Pune News : सुट्ट्यांमुळे 'एमटीडीसी'चे रिसॉर्ट्स फुल्ल

कोकण आणि महाबळेश्वरला पर्यटकांची पहिली पसंती

વક
વિક્રાંત કુલકર્ણી

1 મિનિટ વાંચન

सुट्ट्यांमुळे 'एमटीडीसी'चे रिसॉर्ट्स फुल्ल; कोकण आणि महाबळेश्वरला पर्यटकांची पहिली पसंती
कोकण आणि महाबळेश्वरला पर्यटकांची पहिली पसंती!

कोकण आणि महाबळेश्वरला पर्यटकांची पहिली पसंती

Pune News : सुट्ट्यांमुळे 'एमटीडीसी'चे रिसॉर्ट्स फुल्ल


पुणे, मिरर प्रतिनिधी : निसर्गाच्या सानिध्यात स्वातंत्र्यदिनाची (१५ ऑगस्ट) सुट्टी साजरी करू इच्छिणाऱ्या पर्यटकांनी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या रिसॉर्ट्सला चांगलीच पसंती दिली आहे. सध्या पावसाळी वातावरण आणि जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे महाराष्ट्रातील प्रमुख पर्यटन स्थळांवरील एमटीडीसी रिसॉर्ट्सचे बुकिंग जवळपास शंभर टक्के फुल्ल झाले आहे. (Maharashtra mirror news)


🌧️ पावसाळी पर्यटनासाठी 'या' ठिकाणांना मागणी:
• कोकण किनारपट्टी: सध्या पावसाळा सुरू असल्याने कोकणातील जवळपास सर्वच रिसॉर्ट्स हाऊसफुल्ल आहेत. यामध्ये प्रामुख्याने तारकर्ली, दापोली, गणपतीपुळे, गुहागर, दिवेआगर, हरिहरेश्वर, श्रीवर्धन आणि मुरुड-जंजिरा या ठिकाणांचा समावेश आहे. (Maharashtra mirror news)

• घाटमाथा आणि थंड हवेची ठिकाणे: पावसाळी वातावरणामुळे महाबळेश्वर, पाचगणी, माथेरान, लोणावळा (कार्ला), आंबा घाट, वाई, पन्हाळा आणि जुन्नर (शिवनेरी जवळ) येथील पर्यटन केंद्रांमध्ये पर्यटकांची मोठी गर्दी होणार आहे. (Maharashtra mirror news)


• धार्मिक व ऐतिहासिक स्थळे: श्रावण महिना सुरू असल्याने भीमाशंकर आणि अष्टविनायक परिसरात भाविक-पर्यटकांची गर्दी वाढली आहे. तसेच छत्रपती संभाजीनगर येथील जागतिक वारसा स्थळ असलेल्या अजिंठा-वेरूळ (एलोरा) येथेही पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात बुकिंग केले आहे. (Maharashtra mirror news)
एमटीडीसीच्या रिसॉर्ट्समध्ये पर्यटकांसाठी दोन ते आठ हजार रुपयांपर्यंत रूम उपलब्ध आहेत. हे भाडे ऋतूनुसार (सीझननुसार) आकारले जाते. पर्यटकांच्या सुविधेसाठी ऑनलाइन बुकिंगची सोय उपलब्ध असून, पर्यटक एमटीडीसीच्या अधिकृत वेबसाईटवरून अगदी दोन तास आधीसुद्धा रूम बुक करू शकतात. मात्र, सध्या सुट्ट्यांचा काळ असल्याने आगाऊ बुकिंग करणे फायदेशीर ठरेल, असे आवाहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी केले आहे (Maharashtra mirror news)

શેર કરો