MPSC पेपर फुटी प्रकरणात रोहित पवारांचा खळबळजनक गौप्यस्फोट
पुणे, महाराष्ट्र मिरर
2 મિનિટ વાંચન

MPSC : नीट पेपरफुटी प्रकरणानंतर आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या औषध निरीक्षक भरती प्रक्रियेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
पुणे, महाराष्ट्र मिरर
MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षक भरती परीक्षा प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी एका विशेष पत्रकार परिषदेत मोठा गौप्यस्फोट केला आहे. या प्रकरणाचे भयंकर परिणाम समाजावर होऊ शकतात, असा इशारा देत त्यांनी थेट पुराव्यांसह हा पर्दाफाश केला आहे. mpsc drug inspector paper leak rohit pawar

पत्रकार परिषदेत बोलताना रोहित पवार म्हणाले, “पैसे देऊन एखादा पेपर विकत घेऊन एखादा औषध निरीक्षक झाला असेल तर तो प्रामाणिक काम करेल का? तो पैसे वसूल करण्याचं टार्गेट पहिलं ठेवेल. एका कफ सिरपने २२ मुलं मरण पावली होती, अशा अत्यंत महत्त्वाच्या घटनेच्या तपासणीची जबाबदारी औषध निरीक्षकावर असते.
जर असे अधिकारी पैसे देऊन आले, तर ते प्रामाणिकपणे काम करतील का?” यावेळी त्यांनी टीईटी, नीट, एसआरपीएफ आणि एचएससी केमिस्ट्रीच्या पेपर फुटीचा संदर्भ देत एमपीएससीचा औषध निरीक्षक परीक्षेचा पेपरही फुटला असल्याचे म्हटले आहे. MPSC
Pune : शहरात डेंग्यूचा वेगाने प्रादुर्भाव; दीड महिन्यात ३०० संशयित रुग्ण आढळले

कसा फुटला पेपर? (नंदूरबार कनेक्शन)
प्रकरणाची माहिती देताना त्यांनी नंदूरबारमधील एका अकादमीचा पर्दाफाश केला. २२ मार्च २०२६ रोजी परीक्षा होती, परंतु २० मार्च रोजीच (दोन दिवस आधी) प्रश्नपत्रिका उपलब्ध झाली. नंदूरबारच्या 'कौटिल्य अकॅडमी'मधील एका विद्यार्थ्याला ९० टक्के प्रश्न आधीच मिळाले होते. पैसे मिळाल्यानंतर संबंधित व्यक्ती व्हॉट्सॲपवर प्रश्न पाठवून दोन-तीन मिनिटांत 'डिलिट फॉर ऑल' करायची. एका विद्यार्थ्याने ते डाऊनलोड केलेले प्रश्न आपल्या मित्राला पाठवले, ज्यावरून झालेली चॅट आणि त्याचे पुरावे आता हाती लागले आहेत. १०० पैकी ९० प्रश्नांची हुबेहूब कॉपी देण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला. MPSC
PMC : पुणेकरांचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद; जाणून घ्या कोणत्या भागात येणार नाही पाणी
पेपर फुटीचे 'बार्शी कनेक्शन' आणि संशयास्पद रँकिंग
या प्रकरणामागे मोठे जाळे असल्याचा संशय व्यक्त करत रोहित पवार यांनी बार्शी कनेक्शन समोर आणले. एका नायब तहसीलदाराच्या मुलाला १३ वी रँक (१४९ गुण) आणि मुलीला १६ वी रँक (१४८ गुण) मिळाली आहे. हा केवळ योगायोग आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. कट-ऑफ १०५ गुण असताना, १०३ गुण मिळालेल्या आणि गुणवत्ता यादीत नसलेल्या काही विद्यार्थ्यांना थेट मुलाखतीचे कॉल आल्याचा दावाही त्यांनी केला.
काही विद्यार्थ्यांनी याविषयी एमपीएससीकडे तक्रार केली असता त्यांना कोणतेही उत्तर मिळाले नाही, उलट अधिकाऱ्यांकडून पोलीस कारवाईची धमकी दिली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. तुकाराम मुंडे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असला तरी त्यांच्या अधिकारांना मर्यादा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच संबंधित अकादमीचे फॉरेन्सिक ऑडिट करण्यात यावे. आरोपींचे कॉल रेकॉर्ड्स आणि व्हॉट्सॲप चॅट रीट्रीव्ह करून कठोर कारवाई व्हावी. या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार ('आका') कोण आहे, याचा शोध यंत्रणांनी घ्यावा. अशा मागण्यादेखील रोहित पवार यांनी केल्या आहेत.

View this post on Instagram A post shared by Maharashtra Mirror (@maharashtramirrornews)
