મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

MLC Election Result 2026 : महाराष्ट्राच्या विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीचा दणदणीत विजय; 5 पैकी 3 जागांवर मविआचा झेंडा!

•" नागपूर, मराठवाडा आणि पुण्यात मविआची बाजी; महायुतीला २ जागांवर समाधान ; नागपूर आणि मराठवाडा पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीचा मोठा विजय

વ
વિવેક

1 મિનિટ વાંચન

MLC Election Result 2026 : महाराष्ट्राच्या विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीचा दणदणीत विजय; 5 पैकी 3 जागांवर मविआचा झेंडा!

•"नागपूर, मराठवाडा आणि पुण्यात मविआची बाजी; महायुतीला २ जागांवर समाधान ; नागपूर आणि मराठवाडा पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीचा मोठा विजय

मुंबई :- महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी झालेल्या अत्यंत महत्त्वाच्या निवडणुकीचे निकाल अखेर स्पष्ट झाले आहेत. या निवडणुकीत महाविकास आघाडीने (मविआ) दमदार कामगिरी करत 3 जागांवर विजय मिळवला आहे, तर सत्ताधारी महायुतीला केवळ 2 जागांवर समाधान मानावे लागले आहे. या निकालांमुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली असून मविआच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

विशेषतः संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या नागपूर पदवीधर मतदारसंघात काँग्रेसचे अभिजित वंजारी यांनी भाजपच्या सुधाकर कोहळे यांचा पराभव करत दणदणीत विजय मिळवला. त्याचप्रमाणे, मराठवाडा पदवीधर मतदारसंघात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रतापसिंह पाटील यांनी अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण यांना मात देत मोठा विजय संपादन केला. या विजयांमुळे महाविकास आघाडीची ताकद पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

पुणे इतर जागांवरही चुरस; महायुतीला बसला मोठा धक्का

या निवडणुकीत पुणे पदवीधर मतदारसंघात महायुतीला मोठा धक्का बसला असून, येथे शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीच्या हर्षदा देशमुख विजयी झाल्या आहेत. दुसरीकडे, पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपचे कौस्तुभ गावडे यांनी बाजी मारली तर अमरावती शिक्षक मतदारसंघात शिंदे गटाच्या शिवसेनेचे किरण सरनाईक पुन्हा एकदा विजयी होण्यात यशस्वी ठरले.

पाचपैकी तीन जागांवर महाविकास आघाडीने ताट बळ निर्माण केल्यामुळे आगामी राजकीय घडामोडींच्या दृष्टीने हा निकाल अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जात आहे. सुशिक्षित पदवीधर आणि शिक्षक मतदारांनी सत्ताधाऱ्यांविरोधात दिलेला हा कौल महायुतीसाठी चिंतेचा विषय ठरू शकतो, तर मविआसाठी हा मोठा दिलासा ठरला आहे.

हेही वाचा: Mira Road Crime News : मिरा-रोडमध्ये ज्वेलरी व्यापाऱ्याची 12.15 लाखांची फसवणूक; काशिमीरा गुन्हे प्रकटीकरण कक्षाने दोन आरोपींना ठोकल्या बेड्या

શેર કરો